VIDEO : भर रस्त्यात जवानावर हात उगारणा-या 'त्या' महिलेला पोलिसांचा दणका !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 09:52 PM2017-09-15T21:52:41+5:302017-09-15T22:53:04+5:30

भर रस्त्यात भारतीय लष्कराच्या जवानाला मारहाण करणा-या गुरुग्राममधील एका महिलेला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. 

VIDEO: A woman's hand to the woman who carried her hand in the street! | VIDEO : भर रस्त्यात जवानावर हात उगारणा-या 'त्या' महिलेला पोलिसांचा दणका !

VIDEO : भर रस्त्यात जवानावर हात उगारणा-या 'त्या' महिलेला पोलिसांचा दणका !

Next

नवी दिल्ली, दि. 15 - भर रस्त्यात भारतीय लष्कराच्या जवानाला मारहाण करणा-या गुरुग्राममधील एका महिलेला दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला भर रस्त्यात भारतीय लष्कराच्या जवानाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात गुरुवारी (दि. 14) गुन्हा दाखल केला. या महिलेच्या विरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान 186, 353, 314 आणि 332 च्यानुसार गुन्हा दाखल करत आज तिला गुरुग्राममधील तिच्या घरातून अटक केली आहे. स्मृती कालरा या अटक केलेल्या 44 वर्षीय महिलेचे नाव आहे. 
दिल्लीतील वसंत कुंज भागात गेल्या शनिवारी ही मारहाण करतानाची घटना घडली. यावेळी स्मृती कालराने भरधाव गाडी चालवत असताना लष्कराच्या ट्रकला ओव्हरटेक केले आणि ट्रकच्यासमोर आपली गाडी थांबविली. त्यानंतर ट्रकमधील लष्कराचा जवान खाली उतरला असता स्मृती कालराने थेट त्याच्यावर हात उचलला. यावेळी जवान तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ती त्याला मारहाण करत होती. यानंतर ट्रकमधून अन्य जवान खाली उतरला आणि त्याने मध्ये पडण्याचा प्रयत्न केला असता ही महिला घाईघाईत कारमध्ये बसली आणि निघून गेली.
दरम्यान, हा घडलेला प्रकार दुस-या कारमधील दोन व्यक्तींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. यामुळे हा व्हिडिओ पाहता-पाहता व्हायरल झाला आणि यावर सोशल मीडियातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. या घटनेनंतर पोलिसांनी स्मृती कालरा हिला गुरुग्राम येथील तिच्या राहत्या घरातून अटक केली आहे. तसेच, तिची गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. 

Web Title: VIDEO: A woman's hand to the woman who carried her hand in the street!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.