'तुफानोमे, आंधीमे विश्वास है राहुल गांधीमे', राहुल गांधी आज स्विकारणार काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार; दिल्लीत पोस्टरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2017 08:59 AM2017-12-16T08:59:55+5:302017-12-16T09:03:36+5:30

दिल्लीतील 24 अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात आज राहुल गांधी यांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे

'Tufanomay, the hurricane is trusting Rahul Gandhi', Rahul Gandhi will accept today as Congress president; Poster in Delhi | 'तुफानोमे, आंधीमे विश्वास है राहुल गांधीमे', राहुल गांधी आज स्विकारणार काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार; दिल्लीत पोस्टरबाजी

'तुफानोमे, आंधीमे विश्वास है राहुल गांधीमे', राहुल गांधी आज स्विकारणार काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार; दिल्लीत पोस्टरबाजी

Next

नवी दिल्ली - राहुल गांधी आज अध्यक्षपदाचा पदभार स्विकारणार असल्याने काँग्रेसच्या एका नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. सलग 19 वर्ष पक्षाचं नेतृत्व करत अध्यक्षपद सांभाळणा-या सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर सोपवण्याचा निर्णय घेतला होता. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी वगळता इतर कुणीही अर्ज न केल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली होती. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी 11 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली होती. तसंच राहुल गांधी बिनविरोध निवडल्याचं रामचंद्रन यांनी सांगितलं होतं. लोकसभा निवडणुकीपासून मरगळ आलेल्या पक्षाला पुन्हा एकदा ठाम उभं करण्याची जबाबदारी राहुल गांधींवर असणार आहे. 


दिल्लीतील 24 अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयात आज राहुल गांधी यांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. राहुल यांच्या राज्याभिषेकाचा कार्यक्रम भव्य बनवण्यासाठी देशभरातील काँग्रेस पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यासोबतच मुख्यालय परिसरात मोठमोठे बॅनर्स लावून राहुल गांधींचं अभिनंदन करण्यात येत आहे. 'तुफानोमे, आंधीमे विश्वास है राहुल गांधीमे' अशा घोषणा बॅनरवर लिहिण्यात आल्या आहेत. राहुल गांधी आज सकाळी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचं प्रमाणपत्र स्वीकारतील. 



 

राहुल गांधी काँग्रसचे अठरावे तर गांधी घराण्यातील सहावे अध्यक्ष
राहुल गांधी हे नेहरू-गांधी कुटुंबातून आलेले काँग्रेसचे सहावे अध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी याच सर्वाधिक काळ सलग 19 वर्ष पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. यापूर्वी या घराण्यातील मोतीलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी दोन वेळा अध्यक्षपदाची धूरा सांभाळली होती. राहुल गांधी आता सोनिया गांधी यांच्यानंतर अध्यक्ष होणारे घरातील सहावे अध्यक्ष असतील.

स्वातंत्र्यानंतरचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी
1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते 2017
18) राहुल गांधी - 2017 पासून

Web Title: 'Tufanomay, the hurricane is trusting Rahul Gandhi', Rahul Gandhi will accept today as Congress president; Poster in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.