... तर केजरीवालांना गोळी घालू - स्वामी ओम

By Admin | Updated: February 9, 2015 16:18 IST2015-02-09T16:18:04+5:302015-02-09T16:18:04+5:30

अरविंद केजरीवाल यांनी देशविरोधी काम करणे थांबविले नाही तर त्यांना आम्ही गोळया घालू असे वादग्रस्त वक्तव्य हिंदु महासभेचे नेते स्वामी ओम यांनी केले आहे.

... then put a shot at Kejriwal - Swami Om | ... तर केजरीवालांना गोळी घालू - स्वामी ओम

... तर केजरीवालांना गोळी घालू - स्वामी ओम

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - अरविंद केजरीवाल यांनी देशविरोधी काम करणे थांबविले नाही तर त्यांना आम्ही गोळया घालू असे वादग्रस्त वक्तव्य हिंदु महासभेचे नेते स्वामी ओम यांनी केले आहे. विशेष म्हणजे स्वामी ओम यांनी केजरीवाल यांच्याविरुध्द दिल्लीत निवडणूक लढविली असून या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे.
स्वत:ला हिंदु महासभेचे नेते म्हणवून घेणा-या स्वामी ओम यांची मुलाखत असलेला एक व्हिडिओ यूट्युबवर व्हायरल झाला आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. महात्मा गांधी यांच्यावर गोळ्या झाडल्या, हिंदू महासभा आमची पार्टी असून नथूराम गोडसे हे आमच्याच पार्टीतील होते. महात्मा गांधी यांनी देशाचे तुकडे पाडण्याचे काम केले त्यामुळे त्यांच्यावर गोळया झाडल्या. आगामी काळात जो कोणी देशविरोधी कारवाया करेल त्यांना आधी प्रेमाने समजवण्यात येईल नंतर मात्र त्यांना गोळया घालू असे स्वामी म्हणाले. केजरीवाल यांना याआधी प्रेमाने समजावून सांगितले आहे आता जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांना थेट गोळी घालू. विधानसभा निवडणुकीत आपण उभे राहिलो याचे कारण सांगताना स्वामी म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्या मतांची विभागणी होवून भाजपाची उमेदवार नूपुर शर्मा यांना त्याचा थेट फायदा व्हावा हा उद्देश होता. आपल्यासोबत आसाराम बापू आणि हिंदू महासभेचे कार्यकर्ते यांच्यासह १८ लाख लोकांचे समर्थन असल्याचा दावा करतानाच भाजपा ही आपलीच पार्टी असून २००४ ते २०१४ या काळात आपण नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी काम केल्याचा दावा स्वामी यांनी केला आहे.

Web Title: ... then put a shot at Kejriwal - Swami Om