“संसदेत आम्हाला मराठा आरक्षण मुद्द्यावर बोलू दिले नाही”; प्रियांका चतुर्वेदी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 02:28 PM2023-12-05T14:28:29+5:302023-12-05T14:30:03+5:30

MP Priyanka Chaturvedi News: महाराष्ट्रातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्वलंत मुद्दे संसदेत मांडू दिले जात नाहीत, असा आरोप प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे.

thackeray group mp priyanka chaturvedi allegations we were not allowed to speak on maratha reservation issue in rajya sabha | “संसदेत आम्हाला मराठा आरक्षण मुद्द्यावर बोलू दिले नाही”; प्रियांका चतुर्वेदी यांचा आरोप

“संसदेत आम्हाला मराठा आरक्षण मुद्द्यावर बोलू दिले नाही”; प्रियांका चतुर्वेदी यांचा आरोप

MP Priyanka Chaturvedi News: मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस तापताना पाहायला मिळत आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावरून राजकीय दावे-प्रतिदावे सुरू असताना, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला संसदेत बोलू दिले नाही, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे. 

राज्यसभेत एखादा मुद्दा मांडायचा असेल तर त्याआधी बरीच प्रक्रिया पार करावी लागते. ही सर्व प्रक्रिया मी पार केली होती. सर्व नियम आणि कायदे पाळले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी यावर चर्चा झाली पाहिजे, अशी आमची इच्छा होती. सर्व कायदे पाळून हा मुद्दा बॅलेटमध्ये लिस्ट झाला होता. या लिस्टमध्ये माझे नाव होते. मी १२ क्रमांकावर होते आणि रजनी पाटील १० क्रमांकावर होत्या. दोघांचे मुद्दे सारखेच होते. जेव्हा नावे घेतली तेव्हा आधी रजनी पाटील यांचे नाव वगळले मग माझे वगळले गेले, असा दावा प्रियांका चतुर्वेदी यांनी केला. त्या मीडियाशी बोलत होते. 

हा राज्यस्तरीय विषय असल्याचे सांगून बोलण्याची संधी दिली नाही

मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी शुन्य प्रहारासाठी नोटीस दिली होती. त्याकरता एक बॅलेट असते, त्यामध्ये विषय निवडला जातो. मग त्याची यादी तयार करून ते संसदेत राज्यसभेत पाठवले जाते. या यादीत माझे आणि खासदार रजनी पाटील यांचे नाव होते. आम्ही एकाच मुद्द्यावर बोलणार होतो. पण आम्हाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हा राज्यस्तरीय विषय असल्याचे सांगून आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला बोलण्यास मज्जाव करण्यात आला. महाराष्ट्रातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दे संसदेत मांडले दिले जात नाहीत, याची खंत असल्याचे प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले.

ही एक नवी प्रथा तयार होतेय की...

मराठा आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून हे आंदोलन उग्र झाले, असे सांगण्याचा प्रयत्न केला. राज्यातील मराठा तरुण आत्महत्या करत आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज होत आहे. मंत्रिमंडळातील मंत्रीच मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप गरजेचा आहे, असे मत मांडत, हा अध्यक्षांचा आदेश आहे. ही एक नवी प्रथा तयार होतेय की बॅलेट झाल्यानतंरही अध्यक्ष त्यावर निर्णय घेऊ शकतात की कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे किंवा नाही, अशी टीका प्रियांका चतुर्वेद यांनी केली. 


 

Web Title: thackeray group mp priyanka chaturvedi allegations we were not allowed to speak on maratha reservation issue in rajya sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.