ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी 65 लाखांची सुपारी, सीआयडीकडून तपासाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 11:36 AM2017-10-18T11:36:38+5:302017-10-18T11:46:36+5:30

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी 65 लाखांची सुपारी देण्यात येत आहे. हा धक्कादायक खुलासा एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने केला आहे.

Student gets offer of 65 lakh for assassination of Mamata Banerjee | ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी 65 लाखांची सुपारी, सीआयडीकडून तपासाला सुरुवात

ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी 65 लाखांची सुपारी, सीआयडीकडून तपासाला सुरुवात

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी 65 लाखांची सुपारी देण्यात येत आहे19 वर्षीय विद्यार्थ्याने हा खुलासा केला असून, त्याच्या मोबाइलवर मेसेज आले होतेसीयआडी या प्रकरणाचा तपास करत आहे

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी 65 लाखांची सुपारी देण्यात येत आहे. हा धक्कादायक खुलासा एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने केला आहे. विद्यार्थ्याच्या मोबाइलवर ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी मेसेज पाठवण्यात आला होता. सोमवारी व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आलेल्या या मेसेजमध्ये ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी एक लाख डॉलर म्हणजेच 65 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती. ज्या मोबाइल नंबरवरुन हा मेसेज पाठवण्यात आला आहे, तो अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. माहिती मिळताच पश्चिम बंगाल पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. 

मुर्शिदाबादमधील बेहरामपूर येथे राहणा-या या विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार, 'सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मला मेसेज येण्यास सुरुवात झाली. मेसेज पाठवणारा स्वत: लॅटिन असल्याचं सांगत होता. आपण एका दहशतवादी संघटनेसाठी काम करत असून, भारतामध्ये जोडीदाराचा शोध घेत आहोत असं तो सांगत होता'.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, समोरील अज्ञात व्यक्तीने विद्यार्थ्याला सांगितलं की, 'तुला या कामात मदत करण्यासाठी 65 लाख रुपये देण्यात येतील. काळजी करु नकोस, ती सुरक्षित राहशील. तुझ्या सुरक्षेची जबाबदारी आमची असेल. तु तयार आहेस का ?. दुस-यांदा पुन्हा जवळपास दोन वाजून 46 मिनिटांनी ती व्यक्ती ऑनलाइन आली आणि विद्यार्थ्याला लूजर (पराभवी) म्हणू लागली. साडेतीन वाजता पुन्हा त्याचा मेसेज आला, ज्यामध्ये त्याने आपण भारतात येण्याची योजना आखत असल्याचं सांगितलं. पण विद्यार्थ्याने आपलं आपल्या देशावर प्रेम असून, त्याचा नाश होताना पाहू शकत नाही. यानंतर समोरुन मेसेज आला की, आम्हाला भारताचा नाश करायचा नाहीये. आम्हाला फक्त एका व्यक्तीला संपवायचं आहे'. 

विद्यार्थ्याने सांगितलं की, 'मी यासंबंधी पोलिसांनी माहिती देणं योग्य समजलं. पोलीस ठाण्यात जात असताना जेव्हा मला मेसेज आला तेव्हा मी अजून घाबरलो. त्यात लिहिलं होतं की, पोलीस स्टेशनजवळ तुझं लोकेशन दिसत आहे. तू पोलीस स्टेशनमध्ये चाललायस का ? आमची तुझ्यावर नजर आहे, त्यामुळे मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करु नकोस. नाहीतर तुझी हत्या केली जाईल'.

विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनंतर, पोलिसांनी फोन बंद करण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे सीयआडी या प्रकरणाचा तपास करत आहे. 
 

Web Title: Student gets offer of 65 lakh for assassination of Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.