त्या बातम्या खोट्या, काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चांना मेहबुबा मुफ्तींकडून पूर्णविराम 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2018 10:25 PM2018-07-02T22:25:16+5:302018-07-02T22:25:39+5:30

मेहबुबा मुफ्ती यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

speculations about a possible PDP-INC alliance to form the government in J&K are false -Mehbooba Mufti | त्या बातम्या खोट्या, काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चांना मेहबुबा मुफ्तींकडून पूर्णविराम 

त्या बातम्या खोट्या, काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चांना मेहबुबा मुफ्तींकडून पूर्णविराम 

googlenewsNext

श्रीनगर - भाजपाने पाठिंबा काढल्यानंतर आता काश्मीरमध्ये काँग्रेसच्या पाठिंब्याने मेहबूबा मुफ्ती यांचे सरकार स्थापन होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र मेहबुबा मुफ्ती यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला असून, काँग्रेससोबत आघाडी करण्याचे वृत्त खोटे आहे. तसेच हे वृत्त खोट्या बातम्यांचे दुर्दैवी उदाहरण आहे असे मह्टले आहे. 





आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून केलेल्या ट्विटमध्ये महबूबा मुफ्ती म्हणतात,"जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी पीडीपी आणि काँग्रेस यांच्यात आघाडी होणार असल्याची शक्यता प्रसारमाध्यमांमधून वर्तवण्यात येत आहे. तसेच सोनिया गांधी आणि माझी बैठक झाल्याचा दावाही करण्यात येत आहे. मात्र या बातम्या खोट्या असून, त्या फेक न्यूजचे दुर्दैवी उदाहरण आहेत." 

Web Title: speculations about a possible PDP-INC alliance to form the government in J&K are false -Mehbooba Mufti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.