सोशल मीडियावर प्रचारास सर्व पक्ष सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:27 AM2018-09-17T00:27:20+5:302018-09-17T00:28:08+5:30

समाजमाध्यमांद्वारे जोरदार प्रचार करण्यासाठी बहुतांश पक्षांच्या यंत्रणा सज्ज होत आहेत

On social media, all parties have been promoted | सोशल मीडियावर प्रचारास सर्व पक्ष सरसावले

सोशल मीडियावर प्रचारास सर्व पक्ष सरसावले

Next

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत अनेक पक्ष परस्परांविरोधात प्रत्यक्षात जसे रिंगणात लढणार आहेत; तसेच आभासी जगामध्ये म्हणजेच समाजमाध्यमांद्वारेही जोरदार प्रचार करण्यासाठी बहुतांश पक्षांच्या यंत्रणा सज्ज होत आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जो विजय मिळाला त्यात समाजमाध्यमांद्वारे या पक्षाने केलेल्या जोरदार प्रचाराचाही मोठा हातभार होता. हा इतिहास लक्षात घेऊन आगामी लोकसभा निवडणुकांत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी समाजमाध्यमांद्वारे केल्या जाणाºया प्रचाराकडेही विशेष लक्ष द्यायचे ठरविले आहे.

त्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची व राजकारणाची माहिती असलेला कर्मचारीवर्गही नियुक्त केला जात आहे. काँग्रेस, आप, माकप हे विरोधी पक्षही आपल्या कार्यकर्त्यांना समाजमाध्यमांद्वारे माहितीचे विश्लेषण कसे करायचे व संवाद कसा साधायचा याचे प्रशिक्षण देत आहे. भाजपचे राष्ट्रीय माहिती व तंत्रज्ञान प्रमुख अमित मालवीय यांनी सांगितले की, समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करून निवडणुका जिंकता येतील याचा पहिला साक्षात्कार आमच्या पक्षाला झाला होता. भाजपाचे सुमारे १२ लाख कार्यकर्ते समाजमाध्यमांवर सक्रिय आहेत. त्यांना तज्ज्ञांद्वारे योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.

प्रत्येक जिल्ह्यांत काँग्रेसची डिजिटल रूम
समाजमाध्यमांत काँग्रेसचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर जाणवावे यासाठी गेल्या काही वर्षांपासून पद्धतशीर प्रयत्न सुरु झाले होते. या पक्षाने प्रत्येक राज्यात डिजिटल वॉर रुम स्थापन केल्या आहेत. पक्षाचे समाजमाध्यम विभागाचे प्रमुख दिव्य स्पंदन उर्फ रम्या यांनी सांगितले की, आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यात पक्षाचा समाजमाध्यम कक्ष सुरू करणार आहोत.

माकपचे यूट्युब चॅनेल...
केरळ, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, तामिळनाडू येथील तज्ज्ञांकडून माकप आपला समाजमाध्यम विभाग विकसित करत आहे. आता हा पक्ष फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटरवरही सक्रिय आहे व यूट्युब चॅनलही आहे.

Web Title: On social media, all parties have been promoted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.