'रामाने केलं होतं सीतेचं अपहरण', संस्कृतच्या पुस्तकातून अजब शिकवण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2018 09:15 AM2018-06-01T09:15:27+5:302018-06-01T09:15:27+5:30

संस्कृत विषयाच्या पुस्तकात हा अजब धडा वाचायला मिळाला आहे.

sita was abducted by ram says gujarati textbooks | 'रामाने केलं होतं सीतेचं अपहरण', संस्कृतच्या पुस्तकातून अजब शिकवण

'रामाने केलं होतं सीतेचं अपहरण', संस्कृतच्या पुस्तकातून अजब शिकवण

Next

अहमदाबाद- रावणाने नाही, तर रामाने सीतेचं अपहरण केल्याचा अजब धडा पुस्तकात छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुजरातमध्ये इयत्ता 12वीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात हा अजब धडा वाचायला मिळाला आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी पुस्तकातील चुकीसाठी भाषांतराला जबाबदार धरत स्वतःवरील जबाबदारी झटकली आहे.

'इंट्रेडक्शन टू संस्कृत लिटरेचर' या पुस्तकातील 106 क्रमांकांच्या पानावर ही चूक आहे. राम चरित्राचं वर्णन करताना सीतेच्या अपहरणाबद्दल लिहिण्यात आलं आहे. पण तेथे रावणाच्या जागी राम हा शब्द लिहिण्यात आला आहे. म्हणजेच रामाने सीतेचं अपहरण केलं होतं असं या लेखात म्हटलं आहे. कालिदास यांच्या 'रघुवंशम'मधून हा परिच्छेद घेतला आहे. दरम्यान, इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात ही चूक आहे. गुजराती माध्यमाच्या पुस्तकात ही चूक नाही. 

'सीतेचं अपहरण रामने नाही, तर रावणाने केलं होतं हे सर्वांना माहिती आहे. 'रघुवंशम'मध्येही तसाच उल्लेख आहे, असं माजी संस्कृत प्रोफेसर वसंत भट्ट यांनी सांगितलं. गुजरात स्टेट बोर्ड ऑफ स्कूल टेक्स्टबुक्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितिन पेठानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरूवातीला याबद्दल माहिती देण्यास नकार दिला पण नंतर त्यांनी चुकी मान्य केली. 'ही चूक भाषांतरामुळे झाली असल्याने रावणाच्या जागी राम लिहिण्यात आलं. गुजराती माध्यमाच्या पुस्तकात ही चूक नाही', असं ते म्हणाले. 
 

Web Title: sita was abducted by ram says gujarati textbooks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.