Shocking! The assassination of Chimukali by gang rape and throwing acid on his body | शॉकिंग! पहिल्या पत्नीवर नवरा जास्त प्रेम करायचा, द्वेषभावनेतून चिमुकलीचा खून
शॉकिंग! पहिल्या पत्नीवर नवरा जास्त प्रेम करायचा, द्वेषभावनेतून चिमुकलीचा खून

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला येथे 9 वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चिमुकलीची सावत्र आई, सावत्र भाऊ आणि इतर 5 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये 2 अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. मृत चिमुकली 23 ऑगस्टपासून बेपत्ता होती, त्यामुळे तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याचे बारामुलाचे पोलीस अधीक्षक इम्तियाज हुसैन यांनी म्हटले आहे. आपला नवरा पहिल्या पत्नीवर जास्त प्रेम करायचा आणि ती या मुलीवर जास्त प्रेम करायची. त्यामुळे द्वेषभावनेतून सावत्र आईनेच मुलीच्या हत्येचा कट रचला होता.

पोलीस तपासानंतर या मुलीचा मृतदेह जवळीच जंगल परिसरात आढळून आला. प्राथमिक तपासात हे प्रकरण केवळ हत्येचे असल्याचा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, याप्रकरणी तपासासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर, याप्रकरणात कुटुंबातील व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. तसेच मृत चिमुकलीच्या सावत्र आईची कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार बलात्कार आणि हत्येचा असल्याचे उघड झाले. या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी मुलीचे डोळे फोडले असून तिच्या छातीवर अॅसिड फेकले. या प्रकरणी तिच्या सावत्र आईनेच आरोपींना मदत केली. दरम्यान, पोलिसांनी अॅसिड आणण्यात आलेले कॅन आणि इतर साहित्य जप्त केले आहे.Web Title: Shocking! The assassination of Chimukali by gang rape and throwing acid on his body
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.