धक्कादायक! भाजपा आमदाराने व्हॉट्सअॅपवर शेअर केले 50 पॉर्न फोटो
By Admin | Updated: May 4, 2017 01:09 IST2017-05-03T23:28:59+5:302017-05-04T01:09:00+5:30
कर्नाटकच्या एका भाजपा आमदाराने व्हॉट्सअॅप ग्रुपवर 50 अश्लील फोटो शेअर केल्याची धक्कादायक घटना

धक्कादायक! भाजपा आमदाराने व्हॉट्सअॅपवर शेअर केले 50 पॉर्न फोटो
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 3 - कर्नाटकच्या एका भाजपा आमदाराने व्हॉट्सअॅप ग्रुपवर 50 अश्लील फोटो शेअर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा ग्रुप सरकार आणि माध्यमांमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला होता. महंतेश कवठगीमठ असं त्या आमदाराचं नाव आहे. त्यांनी एक, दोन नव्हे तर एकामागून एक तब्बल 50 अश्लील फोटो शेअर केले.
महंतेश यांनी ‘बेलागावी मीडिया फोर्सेस’ नावाच्या ग्रुपवर हे फोटो शेअर केले. या ग्रुपमध्ये आयएएस आणि आयपीएस अधिका-यांशिवाय अनेक महिला अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि खासदारदेखील आहेत.
या प्रकरणावर महंतेश यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. विमान प्रवासावेळी फोन ऑफ करताना फोन हॅंग झाला होता. त्यामुळे अश्लील फोटोंची पीडीएफ फाइल चुकून ग्रुपवर शेअर झाली असं त्यांनी म्हटलं आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेबाबत काही माहिती नसल्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
पॉर्न पाहणं भाजपाच्या डीएनएमध्ये
या घटनेवर कॉंग्रेसचे प्रवक्ता ब्रजेश कलप्पा यांनी टीका केली आहे. कदाचीत हे चुकून झालं असेल पण सार्वजनिक ठिकाणी पॉर्न पाहणं हे भाजपाच्या डीएनएमध्येच असल्याचं म्हटलं.
यापुर्वी 2012 मध्ये राज्यातील 3 मंत्र्यांना विधानसभेत पॉर्न व्हिडीओ पाहिल्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला होता.