बियाणे दर एप्रिलमध्येच कमी करा शेतकर्यांची अपेक्षा : कृषि केंद्रचालकांना कृषि पदविका सक्तीची असावी
By Admin | Updated: February 22, 2016 00:03 IST2016-02-22T00:03:57+5:302016-02-22T00:03:57+5:30
जळगाव- मागील हंगामात कपाशीच्या बियाण्याचे दर कमी केल्याचा आनंद आहे. पण त्या वेळेस काहीसा उशीर झाला होता. या वेळेसही राज्य शासन कपाशी बियाण्याचे दर कमी करणार आहे. ते एप्रिलमध्येच कमी करावेत. तसेच कृषि केंद्रचालकांना कृषि पदविका व पदविची सक्ती असावी, अशी अपेक्षा शेतकर्यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

बियाणे दर एप्रिलमध्येच कमी करा शेतकर्यांची अपेक्षा : कृषि केंद्रचालकांना कृषि पदविका सक्तीची असावी
ज गाव- मागील हंगामात कपाशीच्या बियाण्याचे दर कमी केल्याचा आनंद आहे. पण त्या वेळेस काहीसा उशीर झाला होता. या वेळेसही राज्य शासन कपाशी बियाण्याचे दर कमी करणार आहे. ते एप्रिलमध्येच कमी करावेत. तसेच कृषि केंद्रचालकांना कृषि पदविका व पदविची सक्ती असावी, अशी अपेक्षा शेतकर्यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कृषि केंद्र चालकास कृषि पदवी किंवा पदविकेचे शिक्षण घेणे बंधनकारक केल्याचा शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. आजपर्यंत कृषि शिक्षण नसताना हा व्यवसाय करण्याची संधी दिली. पण आता काळ बदलला आहे. वैद्यकीय क्षेत्रात असे चालणार नाही. ज्यांना शिक्षण नाही त्या विषयात ते तज्ज्ञ असू शकत नाही. यापुढे कृषि पदवी किंवा पदविकाधारकालाच खते व किटकनाशके विक्रीचा परवाना द्या. तसे नसेल तर या केंद्रांवर तत्सम शिक्षण घेतलेल्या कर्मचार्यांची नियुक्ती करावी. यापूर्वी ५ वी, ६ वीचे शिक्षण घेतलेल्यांनाही खते व किटकनाशकांचे परवाने मिळाले आहेत. ही मंडळी शेतकर्यांना योग्य खते, किटकनाशके देतील का, हा प्रश्न आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.