राम रहिम तुरुंगात करणार भाजी लागवडीचे काम, यासाठी मिळणार 20 रुपयांची मजुरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2017 10:12 PM2017-09-19T22:12:23+5:302017-09-19T22:45:14+5:30

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम याला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या त्याला रोहतक येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.

Ram will pay Rs 20 for wages for the cultivation of vegetable in Ram Rahim | राम रहिम तुरुंगात करणार भाजी लागवडीचे काम, यासाठी मिळणार 20 रुपयांची मजुरी 

राम रहिम तुरुंगात करणार भाजी लागवडीचे काम, यासाठी मिळणार 20 रुपयांची मजुरी 

googlenewsNext
ठळक मुद्दे व्हिआयपी ट्रीटमेंट नाहीभाजी लागवडीचे काम 20 रुपयांची मजुरी मिळणार

चंदीगड, दि. 19 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम याला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सध्या त्याला रोहतक येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे राम रहिम तुरुंगात काम करत असेल, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. मात्र, त्याला तुरुंग प्रशासनाने भाजी लागवडीचे काम दिले आहे. यासाठी त्याला दिवसातील 8 तास काम केल्याबद्दल 20 रुपयांची मजुरी मिळणार आहे.
परिसरात छोटीशी जमीन आहे. त्याठिकाणी राम रहिम भाजीपाला लागवडीचे काम करणार असल्याची माहिती तुरुंग  विभागाचे महासंचालक के. पी. सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले, राम रहिमने आधीच भाजीपाला लागवडीच्या कामाची जबाबदारी स्वीकारली आहे. जे काही भाजीपाल्याचे उत्पादन राम रहिम घेईल, त्याचा उपयोग तुरुंगातील मेसमध्ये करण्यात येणार आहे. याचबरोबर, त्याच्याकडे तुंरुग परिसरात असलेल्या झाडांची छाटणी करण्याचेही काम देण्यात आले आहे. त्यामुळे त्यासाठी त्याला रोज आठ तासांसाठी 20 रुपयांचा मोबदला मिळणार आहे. त्याला देण्यात आलेले हे काम अकुशल कामकाजाच्या वर्गात मोडते. तसेच, त्याला कोणतीही व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात नाही. इतर कैद्यांप्रमाणेच त्याला ठेवण्यात आले आहे, असेही  के. पी. सिंह म्हणाले. 
दरम्यान, दोन साध्वींवर आश्रमात बलात्कार केल्याप्रकरणी राम रहीमला सीबीआय न्यायालयाने प्रत्येकी 10 वर्षे याप्रमाणे एकूण 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे, तसेच दोन्ही गुन्ह्यांबद्दल त्याला प्रत्येकी 15 लाख याप्रमाणे 30 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार असून, त्यापैकी दोन्ही पीडित साध्वींना प्रत्येकी 14 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
 

Web Title: Ram will pay Rs 20 for wages for the cultivation of vegetable in Ram Rahim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.