बलात्कार, हत्येप्रकरणी जन्मठेप भोगत असलेला राम रहीम पॅरोलवर गुपचूप तुरुंगाबाहेर

By बाळकृष्ण परब | Published: November 7, 2020 10:00 AM2020-11-07T10:00:06+5:302020-11-07T10:02:50+5:30

Gurmeet Ram Rahim News : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेला राम रहिम बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यापासून रोहतकमधील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

Ram Rahim, who is serving a life sentence for rape and murder, is secretly out of jail on parole | बलात्कार, हत्येप्रकरणी जन्मठेप भोगत असलेला राम रहीम पॅरोलवर गुपचूप तुरुंगाबाहेर

बलात्कार, हत्येप्रकरणी जन्मठेप भोगत असलेला राम रहीम पॅरोलवर गुपचूप तुरुंगाबाहेर

googlenewsNext
ठळक मुद्देडेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा गुपचूप पॅरोलवर बाहेर आला होता मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील बीजेपी-जेजेपी सरकारने राम रहीमला २४ ऑक्टोबर रोजी एका दिवसाचा पॅरोल दिला होताराम रहीमला त्याच्या आजारी आईची भेट घेण्यासाठी एका दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता

चंदिगड - बलात्कार, हत्या यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम हा गुपचूप पॅरोलवर बाहेर आला होता, अशी माहिती समोर आली आहे. राम रहीम याला एका दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता. हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालील बीजेपी-जेजेपी सरकारने राम रहीमला २४ ऑक्टोबर रोजी एका दिवसाचा पॅरोल दिला होता, असे उघड झाले आहे.

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख असलेला राम रहिम बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्यात न्यायालयाने दोषी ठरवल्यापासून रोहतकमधील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम रहीमला त्याच्या आजारी आईची भेट घेण्यासाठी एका दिवसाचा पॅरोल देण्यात आला होता. राम रहीमची आई गुरुग्राममधील एका रुग्णालयात उपचार घेत आहे. डेराप्रमुख राम रहिमला रोहतकमधील सुनारिया कारागृहातून गुरुग्राममधील रुग्णालयात चोख बंदोबस्तामध्ये नेण्यात आले होते.

राम रहीम हा २४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळपर्यंत आपली आईसोबत थांबला होता. सूत्रांनी सांगितले की, हरयाणा पोलिसांच्या तीन तुकडा त्याच्या सुरक्षेसाठी तैनात होत्या. एका तुकडीमध्ये ८० ते १०० जवान होते. डेराप्रमुख राम रहीमला पोलिसांच्या वाहनातून गुरुग्राममधील रुग्णालयात नेण्यात आले होते. तसेच भेटीच्या वेळी राम रहीमची आई उपचार घेत असलेला फ्लोअर पूर्णपणे रिकामी ठेवण्यात आला होता.


याबाबत रोहतकचे एसपी राहुल शर्मा यांनी सांगितले की, आम्हाला जेल सुपरिंटेंडेंटकडून राम रहीम यांच्या गुरुग्राम दौऱ्यासाठी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यासाठी निवेदन मिळाले होते. आम्ही २४ऑक्टोबर रोजी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली.

दरम्यान, गुरमीत राम रहीमला पॅरोल देण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. राम रहीमला देण्यात आलेल्या पॅरोलची माहिती मुख्यमंत्री आणि हरयाणामधील काही वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनाच याची माहिती होती. इतकेच नाहीतर आपण कुणाला एस्कॉर्ट करत आहोत याची माहिती जवानांनाही नव्हती. मात्र राम रहीमला अशा प्रकारे जामीन देऊन हरयाणामधील अधिकाऱ्यांनी भविष्यात त्याला पॅरोल देण्याचा मार्ग मोकळा करून ठेवला आहे.

Read in English

Web Title: Ram Rahim, who is serving a life sentence for rape and murder, is secretly out of jail on parole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.