राजस्थानमध्ये नाराजांमुळे काँग्रेसच्या अडचणीत भर; आयारामांना संधी दिल्याने बंडखोरांचे राजीनामासत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2018 05:33 AM2018-11-18T05:33:19+5:302018-11-18T05:36:18+5:30

राजस्थानात काँग्रेसची स्थिती चांगली असून, वातावरण सरकारविरोधी आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असे विविध सर्वेक्षणांतून दिसत आहे. त्यामुळे तिथे प्रत्येक नेत्यालाच काँग्रेसची उमेदवारी हवी आहे.

In Rajasthan, rebel trouble for Congress | राजस्थानमध्ये नाराजांमुळे काँग्रेसच्या अडचणीत भर; आयारामांना संधी दिल्याने बंडखोरांचे राजीनामासत्र

राजस्थानमध्ये नाराजांमुळे काँग्रेसच्या अडचणीत भर; आयारामांना संधी दिल्याने बंडखोरांचे राजीनामासत्र

googlenewsNext

- सुहास शेलार

जयपूर : राजस्थानात काँग्रेसची स्थिती चांगली असून, वातावरण सरकारविरोधी आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळू शकते, असे विविध सर्वेक्षणांतून दिसत आहे. त्यामुळे तिथे प्रत्येक नेत्यालाच काँग्रेसची उमेदवारी हवी आहे. ती न मिळाल्याने अनेक नेते व कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यांची समजूत घालण्यात नेत्यांचा वेळ जात आहे. जयपूर, कोटा, बिकानेर व भरतपूरमध्ये नाराज नेत्यांनी शक्तीप्रदर्शन केले तर काहींनी राजीनामासत्र सुरू केले आहे. त्यामुळे विजयश्री खेचून आणण्याच्या प्रयत्नांत असलेल्या नेत्यांना नाराजांची मनधरणी करावी लागत आहे.
काँग्रसने पहिल्या यादीत ४६ नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, एकूण २३ जाट, १३ राजपूत, २९ एससी आणि २४ एसटी उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार व प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट टोंकमधून, तर माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरदारपुरामधून निवडणूक लढत आहेत. मात्र, आयात नेत्यांना उमेदवारी न देण्याच्या राहुल गांधी यांच्या घोषणेला बगल देत राजस्थानात सहा आयारामांना संधी दिली आहे. भाजपातून काँग्रेसमध्ये दाखल झालेले हबीब उर रहमान यांना नागौर, खा. हरीश मीणा यांना देवळी-उनियारा, कन्हैयालाल झंवर यांना बीकानेर पूर्व, तर सोनादेवी बावरी यांना रायसिंह नगरमधून उभे केले आहे. गेल्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेले राजकुमार यांना नवलगड, माजी आयपीएस अधिकारी सवाई सिंह गोदारा यांना खिंवसरमधून तिकिट दिले आहे.
जयपूरमधील किसनपोलमधून अमीन कागजी यांना संधी दिल्याने माजी महापौर व काँग्रेसच्या महासचिव ज्योती खंडेलवाल यांनी राजीनामा दिला आहे. विद्याधर नगरमधून दोनदा निवडणूक लढवलेल्या विक्रम सिंह यांना तिकिट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जयपूर पक्ष कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. विक्रम सिंह अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत आहेत. माजी खासदार ब्रह्मदेव कुमावत यांनीही बंड करीत अपक्ष लढण्याचे संकेत दिले आहेत. जैसलमेरमधून माजी आमदार सुनिता भाटी, डुंगरपूरमधून तिकीट नाकारलेले महेंद्र बरजोड काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या २00 हून अधिक पदाधिकाºयांनी राजीनामे दिले आहेत. सर्वेक्षणांत काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवला असला, तरी बंडखोरीमुळे पक्षाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

रेल्वे रोखल्या, खुर्च्या जाळल्या
राजस्थान काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी. डी. कल्ला यांना बिकानेरमधून तिकीट नाकारल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी रेलरोको केला आणि काँग्रेस कार्यालयातील खुर्च्याही जाळल्या. जयपूर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर नाराज कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. बस्सीमधून तिकीट न मिळाल्याने लक्ष्मण मीणा यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. दक्षिण कोटाची उमेदवारी न मिळाल्याने राखी गौतम यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्या बंडाच्या पवित्र्यात आहेत. दोनदा काँग्रेसशी बंडखोरी करून परत काँग्रेसमध्ये परतलेल्या पृथ्वीराज मीणा
यांना उमेदवारी न मिळाल्याने तेही नाराज आहेत.

Web Title: In Rajasthan, rebel trouble for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.