राहुल गांधी रावण, तर प्रियंका या शूर्पणखा; भाजप आमदाराची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 18:38 IST2019-01-30T18:37:33+5:302019-01-30T18:38:51+5:30
भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह हे वादग्रस्त वक्तव्यांसाठीच ओळखले जातात.

राहुल गांधी रावण, तर प्रियंका या शूर्पणखा; भाजप आमदाराची जीभ घसरली
बलिया : भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमन्ह्यम स्वामी यांच्या टीकेनंतर आता भाजपच्या उत्तर प्रदेशचे वादग्रस्त विधानांसाठी ओळखले जाणारे आमदार सुरेंद्र सिंह यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे रावण तर त्यांची बहिण नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी या शूर्पणखा असल्याचे वक्तव्य केले आहे. महत्वाचे म्हणजे हे त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.
सुरेंद्र सिंह यांनी काँग्रेसमध्ये रावणाची संस्कृती असून प्रजातांत्रिक युद्ध लढण्याचा आरोप लावला आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांची तुलना रावण आणि प्रियंका गांधी या शुर्पनखा या रामायनातील पात्रांशी केली आहे. रावणाने जसे रामासोबतच्या युद्धावेळी शूर्पणखेला पाठवले होते, तसेच राहुल यांनी बहिण प्रियंका हिला पाठविले आहे. तसेच राहुल यांनी प्रियंका यांच्याकडे नेतृत्व देऊन आपले अपयश मान्य केल्याचा आरोप केला आहे.
एवढ्यावरच न थांबता काँग्रेस आता राहुल यांचा भावोजी रॉबर्ट वड्रा यांना राजकारणात आणू शकते. बाटली आणि हॉटेल संस्कृतीला काँग्रेस पोषक असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच मोदी यांची तुलना रामाशी करताना तेच पुन्हा पंतप्रधान होतील असा विश्वासही व्यक्त केला.