हिंमत असल्यास राफेलवर मोदींनी फक्त 20 मिनिटे चर्चा करावी, राहुल गांधींचं ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 09:34 PM2019-01-02T21:34:01+5:302019-01-02T21:35:16+5:30

राफेल करारावरून आज लोकसभेत रणकंदन माजलं.

Rahul Gandhi dares PM Modi for 20 minute one on one debate on Rafale | हिंमत असल्यास राफेलवर मोदींनी फक्त 20 मिनिटे चर्चा करावी, राहुल गांधींचं ओपन चॅलेंज

हिंमत असल्यास राफेलवर मोदींनी फक्त 20 मिनिटे चर्चा करावी, राहुल गांधींचं ओपन चॅलेंज

Next

नवी दिल्ली- राफेल करारावरून आज लोकसभेत रणकंदन माजलं. त्यानंतर आता पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी मोदींना खुलं आव्हान दिलं आहे. राफेलवर चर्चा करण्यासाठी मोदींनी तयार व्हावं. मला फक्त मोदींनी राफेल करारावरच्या चर्चेसाठी 20 मिनिटं द्यावीत. परंतु मोदी माझ्याबरोबर राफेलवर चर्चा करणार नाही. कारण त्यांच्यात हिंमतच नाही, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.

राफेल कराराची जेपीसीमार्फत चौकशी झाल्यास नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानींची नावं बाहेर येतील. म्हणून भाजपा सरकार राफेल कराराच्या चौकशीसाठी जेपीसी गठीत करत नाही आहे. हवाई दलाला 126 लढाऊ विमानांची गरज असतानाही मोदी सरकारने करार बदलून फक्त 36 विमाने खरेदी केली.


तसेच ही विमानं खरेदी करताना त्यांची किंमत 526 कोटींवरून 1600 कोटींपर्यंत वाढवली, जर राफेलमध्ये कोणताही घोटाळा नसेल तर विमानांची किंमत एवढी कशी वाढली, असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. तसेच एनडीए सरकारनं 126 विमानांऐवजी 36 विमानेच खरेदी करण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल विचारत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे.







 

Web Title: Rahul Gandhi dares PM Modi for 20 minute one on one debate on Rafale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.