राहुल गांधी म्हणजे भारताच्या राजकारणातील विदूषक, चंद्रशेखर राव यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 07:42 PM2018-09-06T19:42:42+5:302018-09-06T19:44:26+5:30

राहुल गांधी हे भारताच्या राजकारणातील विदूषक आहेत, अशी टीका तेलंगाणाचे  मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi is the biggest buffoon in the country - Chandrashekhar Rao | राहुल गांधी म्हणजे भारताच्या राजकारणातील विदूषक, चंद्रशेखर राव यांची टीका

राहुल गांधी म्हणजे भारताच्या राजकारणातील विदूषक, चंद्रशेखर राव यांची टीका

Next

हैदराबाद - राहुल गांधी हे भारताच्या राजकारणातील विदूषक आहेत, ते जेवढ्या वेळा तेलंगणामध्ये येतील तेवढ्याच जास्त गागा तेलंगणा राष्ट्र समिती जिंकेल, अशी टीका तेलंगाणाचे  मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाने तेलंगणाची विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस केल्यानंतर राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयाला मंजुरी दिली होती. त्यामुळे राज्यातील निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता तेलंगणामध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभा निवडणूक होणार आहे. 

तेलंगणाची विधानसभा बरखास्त करण्यात आल्यानंतर तेलंगणा राष्ट्र समितीने आज आपल्या 105 उमेदवारांची यादी घोषित केली आहे. उमेदवारांची यादी प्रसिद्ध करतानाच चंद्रशेखर राव यांनी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. " 2014 पूर्वी तेलंगणामध्ये बॉम्बस्फोट, वीजटंचाई आणि सांप्रदायिक तणाव असे अनेक प्रश्न होते. मात्र आता राज्य या सर्व समस्यांमधून मुक्त झाले आहे. आता काँग्रेसच्या नेत्यांनी मैदानात उतरून निवडणूक लढवावी. जनता त्यांना योग्य ते प्रत्युत्तर देईल," असे चंद्रशेखर राव म्हणाले.



 

यावेळी राहुल गांधी यांनाही राव यांनी टीकेचे लक्ष्य बनवले."राहुल गांधी काय आहेत हे सर्वांना माहित आहे. ते देशातील सर्वात मोठे विदूषक आहेत. त्यांनी मोदींची कशाप्रकारे गळाभेट घेतली, तसेच डोळे मारले हे सर्वांनी पाहिले. ते आमच्यासाठी संपत्तीसारखे आहेत. ते जितक्या वेळा तेलंगणामध्ये येतील तेवढ्याच जास्त जागा आम्ही जिंकू." असा दावा राव यांनी केला.  



 

Web Title: Rahul Gandhi is the biggest buffoon in the country - Chandrashekhar Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.