मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींचा नारा; बिनधास्त बोला, प्रश्न विचारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:59 PM2019-03-12T16:59:57+5:302019-03-12T17:01:55+5:30

काँग्रेसचे महासचिवपद स्वीकारून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांना संबोधित करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली.

Priyanka Gandhi Vadra in Gandhinagar, Gujarat | मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींचा नारा; बिनधास्त बोला, प्रश्न विचारा!

मोदींच्या बालेकिल्ल्यात प्रियंका गांधींचा नारा; बिनधास्त बोला, प्रश्न विचारा!

Next

अहमदाबाद - काँग्रेसचे महासचिवपद स्वीकारून राजकारणात सक्रिय झाल्यानंतर प्रथमच कार्यकर्त्यांना संबोधित करणाऱ्या प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी आणि भाजपाने भावनिक मुद्द्यांवर बोलण्यापेक्षा विकासावर चर्चा करावी. असा टोला प्रियंका गांधी यांनी लगावला. तसेच मतदारांनी बिनधास्त बोलून, सरकारला प्रश्न विचारावेत, असे आवाहनही केले. 

गांधीनगर येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज बैठक झाली. त्यानंतर आयोजित जनसभेला संबोधित करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठमोठी आश्वासने देतात. मात्र त्यांना दोन कोटी रोजगार कुठे गेला. महिला सुरक्षेचे काय झाले, याचा प्रश्न मोदींना विचारला पाहिजे. 

प्रेम, समता, बंधुता यांच्या पायावर हा देश उभा आहे. मात्र आज या देशात जे काही घडत आहे ते अत्यंत वाईट आहे.  तुमची जागरुकताच या देशाला घडवणार आहे. स्वातंत्र्याची लढाई याच ठिकाणाहून सुरू झाली होती. आता तिथूनच या सरकारविरोधात आवाज उठवण्यास सुरू झाली पाहिजे, असे आवाहनही प्रियंका गांधी यांनी यावेळी केले. 



 

देशातील घटनात्मक संस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. मने दुभंगलेली आहेत. त्यामुळे देशाचे रक्षण करण्यासाठी एजुटीने काम करण्याची जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आली आहे, असेही त्यांनी सांगितले. 





काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 58 वर्षानंतर गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारणीची बैठक आज झाली. या बैठकीसाठी सोनिया गांधी, महासचिव प्रियंका गांधी तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये होत असलेल्या काँग्रेस  कार्यकारणीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 



 

Web Title: Priyanka Gandhi Vadra in Gandhinagar, Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.