'नीट'संदर्भातील वटहुकूमावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, विद्यार्थ्यांना दिलासा
By admin | Published: May 24, 2016 11:10 AM2016-05-24T11:10:33+5:302016-05-24T11:58:01+5:30
वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) वटहुकूमावर मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्वाक्षरी केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा वर्षभराने पुढे ढकलण्याच्या (नीट) वटहुकूमावर मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी स्वाक्षरी केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश राज्यांच्या सीईटीनुसारच होणार आहे. खासगी वैद्यकीय कॉलेजमधील सरकारी कोट्यातील जागा सीईटीमार्फतच भरल्या जाणार असून इतर जागा व 'डीम्ड' विद्यापीठातील प्रवेश हे 'नीट'मार्फतच होणार आहेत.
विविध राज्यांनी दाखल केलेल्या याचिका फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने देशभरात या वर्षापासूनच ‘नीट’ लागू करण्याचा आदेश दिला असताना केंद्र सरकारने विद्यार्थ्यांच्या अडचणी विचारात घेत वटहुकुमाचा पर्याय निवडला. केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी संबंधित वटहुकुमाला मंजुरी दिली होती. त्यामुळे न्यायालयीन आदेशावर कुरघोडी केली झाली असती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी आरोग्य मंत्रालयाला त्यामागचे कारण विचारले असून वटहुकूमाबाबत राष्ट्रपती भवनातील तज्ज्ञांचे मतही मागवले होते. राष्ट्रपतींनी अध्यादेशाबाबत आणखी माहिती आणि स्पष्टीकरण मागितले होते. अखेर आज सकाळी चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी राष्ट्रपतींनी नीटच्या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. देशाच्या महाधिवक्त्यांनी राष्ट्रपतींना नीटबाबत कायदेशीर बाजू समजावून सांगितली आहे.
दरम्यान आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी राष्ट्रपतींची भेट घेऊन ‘नीट’बाबत राज्यांच्या विरोधाची कारणे व अध्यादेशाची परिहार्यता याची माहिती त्यांना दिली होती.
'नीट’अंतर्गत दुसरी परीक्षा २४ जुलै रोजी होणार आहे. वटहुकूम जारी झाल्यानंतर यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या राज्यमंडळांची प्रवेश परीक्षा दिली आहे त्यांना या दुसऱ्या परीक्षेस बसण्याची गरज नाही, असे विविध सरकारांनी यापूर्वी जाहीर केले होते.