दुसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 04:25 AM2019-04-17T04:25:45+5:302019-04-17T04:25:52+5:30

लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांत निवडणूक होत असून, अटीतटीच्या या लढतींच्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या.

Polling for the second phase tomorrow | दुसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान

दुसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान

Next

लोकसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यात राज्यातील दहा मतदारसंघांत निवडणूक होत असून, अटीतटीच्या या लढतींच्या प्रचारतोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. १ कोटी ५४ लाख मतदार गुरुवारी मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. या टप्प्यात सहा विद्यमान खासदार पुन्हा आपले भाग्य अजमावित आहेत. एकूण १६७ उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी एक-दोन अपवाद वगळता इतर ठिकाणी दुरंगी लढती होत आहेत. महिला मतदारांची संख्या जवळपास पुरुषांच्या बरोबरीने असल्याने त्यांचे मत महत्त्वपूर्ण असेल.
>अमरावती । रंगतदार लढतीची उत्सुकता
अमरावती मतदारसंघात यावेळी मोठी रंगतदार लढत होत आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांना राष्टÑवादी काँग्रेसने समर्थन दिलेल्या नवनीत राणा यांनी कवडे आव्हान दिले आहे. शेवटच्या टप्प्यात अडसुळांनी राणांच्या शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर विकासाचे बोला, असे प्रत्युत्तर राणांनी दिले.
>रेल्वेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य
अमरावती जिल्ह्यात अनेक रेल्वेगाड्यांना थांबा दिला. अमरावतीतील रेल्वे स्थानक निर्मितीसाठी प्रयत्न केले. विमानतळ, रेल्वे वॅगन कारखाना, भारत डायनॅमिक्स, शकुंतला रेल्वे, अचलपूरची फिनले मिल यासाठी प्रयत्न केले. संसदरत्न पुरस्काराने सन्मानित झालो. जनतेचे मुद्दे संसदेत पोटतिडकीने मांडले. स्थिर सरकार आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पुन्हा निवडून देण्याचे आवाहन अडसूळ यांनी केले.
>महिला सबलीकरण आणि युवक
नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांच्या रहिवासाचा मुद्दा उपस्थित केला. अडसूळ बाहेरचे असून ते पीएच्या भरवशावर कारभार करतात, असा आरोप त्यांनी केला. अचलपूर जिल्हा निर्मिती करणार आणि मेळघाटातील तापी प्रकल्प होऊ देणार नाही, बेराजगारांचा प्रश्न, महिलांचे सबलीकरण यावर भर देणार. विकास काय असतो, याची प्रचिती अमरावती मतदारसंघाला देणार.
हेही उमेदवार रिंगणात
वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे, बसपाचे अरुण वानखडे, पीपल्स पार्टी आॅफ इंडियाच्या नीलिमा भटकर, आरिपाचे विनोद गाडे, आंबेडकराइट पार्टी आॅफ इंडियाचे नीलेश पाटील, बहुजन मुक्तीच्या पंचशीला मोहोड, राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीचे नरेंद्र कठाणे, बहुजन मुक्ती मोर्चाचे संजय आठवले, अपक्ष राजू सोनोने, राजू जामनेकर, पंकज मेश्राम, प्रमोद मेश्राम, ज्ञानेश्वर मानकर, अंबादास वानखडे, राहुल मोहोड, विलास थोरात, प्रवीण सरोदे, मीनाक्षी करवाडे, राजू मानकर, अनिल जामनेकर, श्रीकांत रायबोले, विजय विल्हेकर.

Web Title: Polling for the second phase tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.