हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये दाखल; 'या' जागेवरून निवडणूक लढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 05:20 PM2019-03-12T17:20:27+5:302019-03-12T17:22:23+5:30

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Patidar leader Hardik Patel joins Congress party. | हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये दाखल; 'या' जागेवरून निवडणूक लढणार

हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये दाखल; 'या' जागेवरून निवडणूक लढणार

Next
ठळक मुद्देहार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज अहमदाबादमध्ये महत्त्वाची बैठक सुरु आहे. हार्दिक पटेल लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते.

अहमदाबाद : गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी मंगळवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अहमदाबादमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. यावेळी हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज अहमदाबादमध्ये महत्त्वाची बैठक सुरु आहे. या ठिकाणाहूनच आज काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. या बैठकीला पूर्व उत्तर प्रदेशासाठी सरचिटणीस म्हणून निवड झालेल्या प्रियंका गांधी उपस्थित आहेत. याशिवाय, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.

दरम्यान, गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून हार्दिक पटेल निवडणूक लढविणार असल्याची माहिती याआधी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा हात धरुन हार्दिक पटेल लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते.



 

हार्दिक पटेल यांनी 21 फेब्रुवारीला उत्तरप्रदेशमध्ये सपा मुख्यालयात अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पटेल यांनी सपा-बसपा युतीचे स्वागत केले होते. तसेच ही युती भाजपाला हरवू शकते असेही म्हटले होते. लोक भाजपापासून त्रासलेले असून त्याना सुटका हवी आहे, असे वक्तव्य पटेल यांनी केले होते. महत्त्वाचे म्हणजे या युतीमध्ये काँग्रेसला वगळण्यात आले आहे. 

गुजरात मॉडेलचे खरे रुप...
हार्दिक पटेल यांनी यावेळी तथाकथीत गुजरात मॉडेलवरही टीका केली होती. आज जे गुजरात मॉडेल अवघ्या देशभरात खपवले जात आहे. त्याच गुजरातच्या 20 जिल्ह्यांमध्ये शेतासाठी पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. आज शेतकरी, तरुण, महिला सर्व त्रासलेले आहेत. जो ही सरकारला प्रश्न विचारतो त्याला देशद्रोही ठरविले जाते. आम्हाला या लोकांनी देशभक्ती काय असते हे शिकविण्याची गरज नाही, असेही हार्दिक पटेल यांनी म्हटले होते. 

- पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून 2015 मध्ये आंदोलन उभे राहिले होते. यावेळी हिंसाही झाली होती. तसेच चिथावणी दिल्याने झालेल्या तोडफोडप्रकरणी हार्दिक पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 
 

Web Title: Patidar leader Hardik Patel joins Congress party.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.