श्रीदेवीप्रमाणे NRI महिलेचा मृत्यू, बाथटबमध्ये आढळला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2018 11:13 AM2018-04-28T11:13:01+5:302018-04-28T11:13:01+5:30

अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या एका 40 वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेचा हरियाणातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मृत्यू झाला आहे.

nri woman dead body found in hotel bathtub | श्रीदेवीप्रमाणे NRI महिलेचा मृत्यू, बाथटबमध्ये आढळला मृतदेह

श्रीदेवीप्रमाणे NRI महिलेचा मृत्यू, बाथटबमध्ये आढळला मृतदेह

सूरजकुंड- अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या एका 40 वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेचा हरियाणातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी यांचा ज्याप्रमाणे बाथटबमध्ये बुडून मृत्यू झाला होता त्याचप्रमाणे या महिलेचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी रात्री या महिलेचा मृतदेह बाथटबमध्ये सापडला. 

अमेरिकेतील न्यूजर्सी येथे राहत असलेल्या भारतीय वंशाच्या रितू कुमार कामानिमित्त भारतात आल्या होत्या. २२ एप्रिलला सूरजकुंडमधील एका हॉटेलमध्ये त्यांनी रुम बूक केली. रितू कुमार २६ एप्रिलपासून आपल्या कोणत्याही नातेवाईकांच्या फोनचं उत्तर देत नव्हत्या. फोन रिंग होत असूनही उचलत नसल्याने कुटुंबातील सदस्यांना हरियाणा पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी हॉटेलमध्ये जाऊन रितू कुमार यांची चौकशी केली.
रितू कुमार रुमच्या बाहेर न पडल्याने तसंच कोणतीही रुम सर्व्हिस न घेतल्याने पोलिसांना संशय आला. रुम उघडून आतमध्ये गेल्यानंतर रितू कुमार यांचा मृतदेह बाथटबमध्ये पडला होता. पोलिसांनी रुम सील केला असून, फॉरेन्सिक टीमकडून तपासणी करुन घेतली आहे. 

दरम्यान, तपास पथक घटनास्थळावरून पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करत आहे. प्राथमिक तपासात घटनास्थळावरून कुठलही सुसाइड नोट सापडली नाही. तसंच रितू यांनी मद्याचं सेवन केल असल्याचंही आढळून आलेलं नाही. ह्रदय विकाराने रितू यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. 

Web Title: nri woman dead body found in hotel bathtub

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.