एनडीएसाठी खूशखबर, मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कोनराड संगमा विजयी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 01:09 PM2018-08-27T13:09:59+5:302018-08-27T13:12:00+5:30

मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत एनडीएला खूशखबर मिळाली आहे.

NPP leader Conrad Sangma wins South Tura assembly bypoll seat | एनडीएसाठी खूशखबर, मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कोनराड संगमा विजयी 

एनडीएसाठी खूशखबर, मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कोनराड संगमा विजयी 

Next

शिलाँग - गेल्या काही काळात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपा आणि एनडीएला सातत्याने पराभव पत्करावा लागला होता. मात्र मेघालय विधानसभा पोटनिवडणुकीत मात्र एनडीएला खूशखबर मिळाली असून, एनडीएतील घटक पक्ष असलेल्या एनपीपीचे उमेदवार आणि राज्याचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी विजय मिळवला आहे. दक्षिण तुरा विधानसभा मतदारसंघात झालेल्या या पोटनिवडणुकीत संगमा यांनी 8 हजार मतांनी विजय मिळवला. या पोटनिवडणुकीसाठी गेल्या आठवड्यात मतदान झाले होते. या निकालाबरोबरच मेघालय विधानसभेत एनपीपीची सभासद संख्या 20 वर पोहोचली असून, एनपीपीचे काँग्रेस एवढेच म्हणजे 20 सभासद झाले आहेत. 





मेघालयमध्ये यावर्षी मार्च महिन्यात मतदान झाले होते. या निवडणुकीत त्रिशंकू निकाल लागल्यानंतर एनपीपीने भाजपा आणि अन्य छोट्या पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. एनपीपीचे नेते कोनराड संगमा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र तेव्हा ते विधानसभेचे सभासद नव्हते. 

60 सदस्यांच्या मेघालय विधानसभेमध्ये एनडीएकडे 35 सदस्यांचा पाठिंबा आहे. यामध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे 20, भाजपाचे दोन, युनायटेड डेमोक्रेटिक पार्टिचे 6, एचएसपीडीपीचे दोन, पीडीएफचे 4 आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे. 
 

Web Title: NPP leader Conrad Sangma wins South Tura assembly bypoll seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.