नव-याला पाणी न विचारणं क्रूरता आहे का ? उच्च न्यायालय म्हणतं...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2018 09:17 AM2018-03-04T09:17:21+5:302018-03-04T09:17:21+5:30

नव-याच्या गरजा पूर्ण न करणे किंवा कामावरून घरी परतल्यावर नव-याला पाणी देण्याबाबत विचारणा न करणे यामध्ये...

Not offering water to husband is not cruelty says Bombay HC | नव-याला पाणी न विचारणं क्रूरता आहे का ? उच्च न्यायालय म्हणतं...

नव-याला पाणी न विचारणं क्रूरता आहे का ? उच्च न्यायालय म्हणतं...

Next

मुंबई: नव-याच्या गरजा पूर्ण न करणे किंवा कामावरून घरी परतल्यावर नव-याला पाणी देण्याबाबत विचारणा न करणे यामध्ये कोणतीही क्रूरता नाही असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मुंबईच्या सांताक्रूज येथील 52 वर्षांच्या एका बॅंक कर्मचा-याने केलेल्या घटस्फोट याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हे स्पष्ट केलं. 
क्रूरतेच्या आधारे या व्यक्तीने आपल्या 40 वर्षीय पत्नीपासून घटस्फोटाची मागणी केली होती. माझी पत्नी माझ्या गरजा पूर्ण करत नाही, मी रात्री कामावरून परतल्यावर ती मला साधं पाणीही विचारत नाही असं त्याने याचिकेत म्हटलं होतं. न्या. कमल किशोर आणि सारंग कोटवाल यांच्या खंडपिठासमोर याबाबत सुनावणी झाली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, यावेळी खंडपिठाने याचिकाकर्त्याची पत्नी स्वतः देखील शिक्षिका असण्याकडे लक्ष वेधलं. दिवसभर काम करून पत्नी देखील थकलेली असते. तरी देखील ती कुटुंबियांसाठी जेवण बनवते तसंच घरातील इतर कामंही करते असं कोर्टाने म्हटलं. या दांपत्याचं 2005 मध्ये लग्न झालं असून पत्नी उशीरा घरी येते आणि आई-वडिलांसोबत भाडणं करते असाही दावा पतीने केला होता. 
 

Web Title: Not offering water to husband is not cruelty says Bombay HC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.