काँग्रेसच्या कार्यकारिणीतून सुशीलकुमार शिंदे अन् दिग्विजयसिंह 'आऊट'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 01:09 PM2018-07-18T13:09:50+5:302018-07-18T16:56:10+5:30

काँग्रेसकडून पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीमध्ये युवा वर्गाचाही समावेश करण्यात आला आहे. तर काही ज्येष्ठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे.

New Congress Working Committee announced, Rahul Gandhi's new team with 51 members | काँग्रेसच्या कार्यकारिणीतून सुशीलकुमार शिंदे अन् दिग्विजयसिंह 'आऊट'

काँग्रेसच्या कार्यकारिणीतून सुशीलकुमार शिंदे अन् दिग्विजयसिंह 'आऊट'

Next

नवी दिल्ली - काँग्रेसकडून पक्षाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या नव्या कार्यकारिणीमध्ये युवा वर्गाचाही समावेश करण्यात आला आहे. तर काही ज्येष्ठ सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जुन्या कार्यकारिणीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना 'आऊट' करण्यात आले आहे. या कार्यकारिणीमध्ये 23 सदस्य, 19 निमंत्रित स्थायी सदस्य आणि 9 निमंत्रित सदस्य असणार आहेत, असे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी सांगितले. त्यामुळे राहुल गांधींच्या नव्या टीममध्ये 51 सदस्य असतील.

काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, पक्षाचे खजिनदार मोतीलाल वोरा, अशोक गहलोत, गुलाब नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, एके एंटोनी, अहमद पटेल, अंबिका सोनी आणि ओमन चांडी यांना स्थान देण्यात आले आहे. यांसह आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगई, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत, ज्येष्ठ नेते आनंद शर्मा, कुमारी शैलजा, मुकूल वासनिक, अविनाश पांडे, केसी वेणुगोपाल, दीपक बाबरिया, ताम्रध्वज साहू, रघुवीर मीणा आणि गैखनगम यांचाही काँग्रेस कार्यकारिणीत समावेश झाला आहे.

निमंत्रित स्थायी सदस्य - 
काँग्रस कार्यकारिणीच्या निमंत्रित स्थायी सदस्यांमध्ये दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित, माजी वित्तमंत्री पी.चिदंबरम, ज्योदिरादित्य सिंधिया, बाळासाहेब थोरात, तारिक हमीद कारा, पी.सी. चाको, जितेंद्रसिंह, आरपीएनसिंह, पी.एल.पुनिया, रणदीप सुरजेवाला, आशा कुमारी, रजनी पाटील, रामचंद्र खुटिया, अनुग्रह नारायण सिंह, राजीव सातव, शक्तिसिह गोहिल, गौरव गोगई आणि ए. चेल्लाकुमार यांचा समावेश आहे. 

विशेष निमंत्रित सदस्य - 
विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये केएच. मुनियप्पा, अरुण यादव, दीपेंद्र हुडा, जितिन प्रसाद, कुलदीप विश्नोई, इंटकचे अध्यक्ष जी.संजीव रेड्डी, भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष केशवचंद यादव, एनएसयुआयचे अध्यक्ष फिरोज खान, आखिल भारतीय महिला काँग्रेस अध्यक्षा सुष्मिता देव आणि काँग्रेस सेवा दलाचे प्रमुख संगठक लालजीभाई देसाई यांचा समावेश करण्यात आला आहे. 

दरम्यान, या पूर्वीच्या कार्यकारिणीतील बीके हरिप्रसाद, सीपी जोशी, दिग्विजय सिंह, हेमो पूर्वा सैकिया, जनार्दन द्विवेदी, कमल नाथ, मोहन प्रकाश, सुशील कुमार शिंदे, सुशीला तिरिया, आशा कुमारी, ए चेला कुमार, कर्ण सिंह, ऑस्कर फर्नांडीज आणि के एच मुनियप्पा यांना बाहेर काढण्यात आले आहे.

Web Title: New Congress Working Committee announced, Rahul Gandhi's new team with 51 members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.