केरळात एनडीआरएफच्या जवानाने पुरातून वाचविले चिमुकल्याचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 05:47 AM2018-08-13T05:47:11+5:302018-08-13T05:47:53+5:30

पाऊस आणि पुराने थैमान घातलेल्या केरळमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएल) एका अधिकाऱ्याने बचाव मोहिमेदरम्यान दाखविलेल्या धाडसाची सोशल मीडियावर मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे.

NDRF's survivor saved child life from the flood in Kerala | केरळात एनडीआरएफच्या जवानाने पुरातून वाचविले चिमुकल्याचे प्राण

केरळात एनडीआरएफच्या जवानाने पुरातून वाचविले चिमुकल्याचे प्राण

इडुक्की - पाऊस आणि पुराने थैमान घातलेल्या केरळमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएल) एका अधिकाऱ्याने बचाव मोहिमेदरम्यान दाखविलेल्या धाडसाची सोशल मीडियावर मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे. कन्हैया कुमार असे या अधिकाºयाचे
नाव आहे.
इडुक्की धरणानजीकच्या अरुंच चेरुथोनी पुलाच्या दुसºया बाजूला एक व्यक्ती मुलीला कडेवर घेऊन मदतीसाठी हातवारे करीत हाका मारत असल्याचे कन्हैया कुमारला दिसले. त्याने शिताफीने धाव घेऊन मुलीला कवेत घेतले आणि स्वत:च्या जिवाची पर्वा न करता चित्त्याच्या चपळाईने माघारी परतल्याने त्या आजारी मुलीला जीवदान मिळाले.
पाऊस आणि धरणातून पाणी सोडण्यात आल्याने केरळात अनेक ठिकाणी पुराने थैमान घातले आहे. एनडीआरएफचे जवान पूरग्रस्त भागात मोठ्या हिमतीने बचाव व मदतकार्य करीत आहेत. वायनाड जिल्ह्यातील ओरापल्ली गावातील काबिनी नदीत अडकलेली एक व्यक्ती, दोन महिला आणि तीन बालकांना एनडीआरएफच्या पथकाने सहीसलामत वाचविले. तमाम गरजूंप्रती तळमळीची चिंता. मग मानव असो जनावरे, असे टिष्ट्वट करून एनडीआरएफने आपल्या जवानांनी वाचविलेल्या लोकांची छायाचित्रे पोस्ट केली आहेत.\

काय म्हणाला जवान...

पाणी वाढत होते. पुलाच्या दुसºया बाजूला एक व्यक्ती मुलीला सोबत घेऊन मदतीसाठी हातवारे करीत असल्याचे दिसले. मी तत्काळ पूल ओलांडून मुलीला कवेत घेऊन सर्व बळ एकवटून धावत परत पुलाच्या दुसºया टोकावर परतलो. नंतर मागे वळून पाहतो, तर हा पूल पाण्यात बुडाला होता, असे त्याने सांगितले.

Web Title: NDRF's survivor saved child life from the flood in Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.