PM मोदींकडून ‘मन की बात’ला अर्धविराम, तीन महिने होणार नाही प्रसारण, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 12:35 PM2024-02-25T12:35:57+5:302024-02-25T12:36:32+5:30

Man ki Baat: २०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. गेली दहा वर्षे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला अर्धविराम लागणार आहे.

Narendra Modi: The reason behind PM Modi's suspension of 'Mann Ki Baat', will not air for three months, has come to light | PM मोदींकडून ‘मन की बात’ला अर्धविराम, तीन महिने होणार नाही प्रसारण, समोर आलं असं कारण

PM मोदींकडून ‘मन की बात’ला अर्धविराम, तीन महिने होणार नाही प्रसारण, समोर आलं असं कारण

२०१४ मध्ये पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधण्यास सुरुवात केली होती. या कार्यक्रमामधून नरेंद्र मोदी हे देशातील विविध प्रश्नांवर भाष्य करतात. तसेच विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचीही ओळख करून देतात. दरम्यान गेली दहा वर्षे सुरू असणाऱ्या या कार्यक्रमाला अर्धविराम लागणार आहे. आज ‘मन की बात’च्या प्रसारणादरम्यान मोदींनी याबाबतची माहिती दिली. मार्च महिन्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू होणार आहे.अशा परिस्थितीत पुढचे तीन महिने मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण होणार नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. आज प्रसारित झालेला हा भाग मन की बात कार्यक्रमाचा ११० वा भाग होता. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, देशामध्ये नमो ड्रोन दीदी ची चर्चा होत आहे. नारीशक्ती प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. काही दिवसांनंतर ८ मार्च रोजी आपण महिला दिल सारजा करणार आहोत. हा खास दिवस देशाच्या विकासामध्ये महिलांच्या योगदानाला सॅल्युट करण्याची संधी प्रदान करतो. महान कवी भरतियार यांनी सांगितले होते की, जेव्हा महिलांना समान संधी दिली जाईल त्याचवेळी जग खऱ्या अर्थाने बहरेल.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी डिजिटल गॅझेटचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, डिजिटल गॅझेटच्या मदतीने आता वन्यप्राण्यांशी ताळमेळ साधण्यास मदत मिळत आहे, याची तुम्ही कल्पना करू शकता का? देशाच्या वेगवेगळ्या भागात वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे, हे ऐकून तुम्हाला आनंद होईल. आज युवा उद्योजकसुद्धा वन्यजीव संरक्षण आणि इको टुरिझमसाठी नवनव्या कल्पना समोर आणत आहेत. भारतामध्ये निसर्गासोबत ताळमेळ आपल्या संस्कृतीचा अभिन्न भाग आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.  

Web Title: Narendra Modi: The reason behind PM Modi's suspension of 'Mann Ki Baat', will not air for three months, has come to light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.