मोटारसायकल चोरी
By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:33+5:302016-04-26T00:16:33+5:30
देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील स्मशानभूमीतून मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली़ सोमनाथ रामनाथ निर्मळ यांनी खटकळी स्मशानभूमीच्या परिसरात मोटारसायकल उभी केली होती़ याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

मोटारसायकल चोरी
द वळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील स्मशानभूमीतून मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना घडली़ सोमनाथ रामनाथ निर्मळ यांनी खटकळी स्मशानभूमीच्या परिसरात मोटारसायकल उभी केली होती़ याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़किग्ज ग्रुपकडून अन्नदान राहुरी : राहुरी फॅक्टरी येथील किंग्स ग्रूप, ईगल सोशल संस्था व जय बजरंग मित्रमंडळ यांनी अन्नदानाचा राबविलेला उपक्रम स्तुत्य असल्याचे मत आदर्श मल्टिस्टेटचे अध्यक्ष शिवाजी कपाळे यांनी व्यक्त केले़ यावेळी नगरसेविका प्रमिला कोळसे, बाबासाहेब मुसमाडे, नारायण घाडगे उपस्थित होते़धस यांना पुरस्कारदेवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा येथील उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक सुनील धस यांना ग्रामविकास प्रतिष्ठान कोकणगाव या संस्थेच्या वतीने समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ डॉ़ सुधीर तांबे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले़ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल राहुरी : पिंप्री अवघडचे माजी सरपंच सुरेश लांबे यांच्याविरूद्ध राहुरी पोलीस स्टेशनमध्ये ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ यासंदर्भात शकुंतला गायकवाड यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली़