ऑनलाईन गेम खेळताना 2 मुलांची आई पडली अल्पवयीन मुलाच्या प्रेमात; घरदार सोडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 11:50 AM2024-02-21T11:50:41+5:302024-02-21T11:53:23+5:30

प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेली एक विवाहित महिला आपल्या मुलासह त्याच्या घरी पोहोचली. हे पाहून मुलाच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला.

mother of child fell in love with minor while playing online free fire games | ऑनलाईन गेम खेळताना 2 मुलांची आई पडली अल्पवयीन मुलाच्या प्रेमात; घरदार सोडलं अन्...

ऑनलाईन गेम खेळताना 2 मुलांची आई पडली अल्पवयीन मुलाच्या प्रेमात; घरदार सोडलं अन्...

Free Fire हा ऑनलाईन गेम खेळत असताना उत्तराखंडमधील एक महिला मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यातील एका मुलाच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेली एक विवाहित महिला आपल्या मुलासह त्याच्या घरी पोहोचली. हे पाहून मुलाच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला. माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले, त्यांनी महिलेला समजावून उत्तराखंडला परत पाठवलं.

सीधी जिल्ह्यातील सिहावल चौकीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला फ्री फायर गेम खेळण्याची सवय होती. या ऑनलाईन गेमिंगदरम्यान, अल्पवयीन मुलगा उत्तराखंडमधील एका महिलेच्या प्रेमात पडला. प्रियकराच्या प्रेमात वेडी झालेली मुलाची आई उत्तराखंडमधून थेट आपल्या अल्पवयीन प्रियकराच्या घरी पोहोचली. याची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. 

उत्तराखंडमधून आलेल्या महिलेला पाहण्यासाठी गावातील लोक जमले होते. अल्पवयीन मुलाचं कुटुंब त्या महिलेला कोणत्याही परिस्थितीत घरात ठेवण्यास तयार नव्हतं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बरीच समजूत काढल्यानंतर महिलेला उत्तराखंडला परत पाठवण्यात आलं आहे.
 
सीधी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अरविंद श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्री फायर ऑनलाईन गेममुळे उत्तराखंडमधील एका महिलेचे सिहवाल चौकीतील अल्पवयीन मुलाशी प्रेमसंबंध होते. गावकरी आणि पोलिसांशी चर्चा केल्यानंतर महिलेला परत पाठवण्यात आलं आहे. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: mother of child fell in love with minor while playing online free fire games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.