मनमोहन सिंग यांनी मोदींपेक्षा जास्त परदेश दौरे केले : अमित शहा

By Admin | Updated: May 4, 2017 17:51 IST2017-05-04T17:51:23+5:302017-05-04T17:51:23+5:30

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त परदेश दौरे केल्याचा दावा

Manmohan Singh travels abroad more than Modi: Amit Shah | मनमोहन सिंग यांनी मोदींपेक्षा जास्त परदेश दौरे केले : अमित शहा

मनमोहन सिंग यांनी मोदींपेक्षा जास्त परदेश दौरे केले : अमित शहा

>ऑनलाइन लोकमत
पालमपूर, दि. 4 - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त परदेश दौरे केल्याचा दावा भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. गुरूवारी हिमाचल प्रदेशमधील पालमपूर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. 
 
यावेळी त्यांनी मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्यावरून टीका केली. पंतप्रधान मोदी वारंवार परदेश दौऱ्यावर असतात असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो याबाबत बोलताना, मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा जास्त परदेश दौरे केले आहेत. मनमोहन परदेश दौऱ्यावर असायचे, त्यावेळी त्यांची कोणीही दखल घ्यायचं नाही असं ते म्हणाले.  
 
पंतप्रधान पदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतरच्या पहिल्या 25 महिन्यांमध्ये नरेंद्र मोदी 27 वेळा आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर गेले. या दरम्यान त्यांनी 43 देशांना भेट दिली आहे. 
 
पालमपूर येथे बोलताना शहा यांनी भाजपाशासित राज्यातील कामगिरीवर समाधान व्यक्त केले.  
 
पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जाऊन जगभरातील नेत्यांसोबत फोटो काढतात, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना सोबत न घेता परदेश दौऱ्यांवर जाऊन परराष्ट्र धोरणदेखील मोदीच ठरवतात, अशी टीका विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असते. 

Web Title: Manmohan Singh travels abroad more than Modi: Amit Shah