...अन् त्यानं काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत फडकावला तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 07:39 PM2019-05-15T19:39:08+5:302019-05-15T19:41:08+5:30

बुधवारी काँग्रेसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ झाला आहे.

man interrupts media briefing by congress spokesperson pawan khera on yogi adityanath govt ajay singh bisht | ...अन् त्यानं काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत फडकावला तिरंगा

...अन् त्यानं काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत फडकावला तिरंगा

googlenewsNext

नवी दिल्ली- बुधवारी काँग्रेसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ झाला आहे. पत्रकार परिषदेदरम्यान एक व्यक्ती अचानक तिरंगा हातात घेऊन मध्येच येऊन उभा राहिला. त्यानं काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हस्तक्षेप केला आणि योगी आदित्यनाथ यांना अजय सिंह बिश्ट म्हणणं म्हणजे भारतीय संस्कृतीचा अपमान असल्याचं सांगितलं. तसेच त्यानं वंदे मातरम, भारत माता की जयच्याही घोषणा दिल्या. त्यामुळे पत्रकार परिषदेत एकच खळबळ उडाली.

या व्यक्तीचं नाव नचिकेता वाल्हेकर असून, तो महाराष्ट्रातल्या हिम्मतनगरमधला रहिवासी आहे. तो भाजपा कार्यकर्ता असल्याचंही म्हटलं जातंय. तो म्हणाला, त्यांची ममता बॅनर्जींचं नाव घेण्याची हिंमत होत नाही. त्यांना निवडणूक सांभाळता येत नाही. असे लोक फक्त मोदी-शहा, मोदी-शहा करतात. मोदी-शाहांनी देशासाठी बरंच काही केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशमधील कायदा-सुव्यवस्था सांभाळण्यात अपयश आल्याचं म्हटलं आहे. लोकसभेत होत असलेल्या पराभवामुळेच काँग्रेस असे आरोप करत असल्याचंही तो म्हणाला आहे.


रायबरेलीमध्ये काँग्रेसचे आमदार अदिती सिंह झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत पवन खेडा म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये जी हिंसा झाली, आमच्या आमदारावर जीवघेणा हल्ला झाला. आज प्रियंका तिकडे गेल्या आहेत. इथे आपल्याला मोदी-शाह मॉडल दिसेल. मोदी-शाह मॉडल बंगालमध्येही आहे आणि उत्तर प्रदेशमध्येही आहे.  जसं उत्तर प्रदेशात आमदार सुरक्षित नाहीत. हे अजय सिंह बिश्त आणि मोदी-शाह मॉडल आहे. विचार करा लोकांची अवस्था काय होत असेल. उत्तर प्रदेश राज्यातील व्यवस्था बिघडली आहे. मोदी-शाहांचे फक्त 8-9 दिवस बाकी आहेत, असंही काँग्रेसवाले म्हणाले आहेत. 

Web Title: man interrupts media briefing by congress spokesperson pawan khera on yogi adityanath govt ajay singh bisht

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.