Animal Abuse : संतापजनक ! मध्य प्रदेशात गोमातेवर बलात्कार,आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 12:32 IST2018-08-09T12:25:09+5:302018-08-09T12:32:10+5:30
हरियाणातील मेवात जिल्ह्यात गरोदर बकरीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात गायीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

Animal Abuse : संतापजनक ! मध्य प्रदेशात गोमातेवर बलात्कार,आरोपी गजाआड
भोपाळ - जनावरांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत जात आहे. काही दिवसांपूर्वी हरियाणातील मेवात जिल्ह्यात गरोदर बकरीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात गायीवरबलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. चीड आणणारी ही घटना राजगड जिल्ह्यातील सुठालिया परिसरात घडली आहे. या अमानवीय कृत्यासाठी ग्रामस्थांनी एका वयोवृद्ध व्यक्तीवर संशय व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एक स्थानिक व्यापारी शुक्रवारी (3 ऑगस्ट) रात्री घरी परतत असताना त्यांनी एका वयोवृद्ध व्यक्तीला गायीवर अत्याचार करताना पाहिले. याप्रकरणी छोटे खान असे नाव असलेल्या व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. गावातील मंदिर परिसरातच छोटे खाननं गायीवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
(Animal Abuse : कुठे चाललोय आपण?; बकरीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेनं फरहान अख्तर उद्विग्न)
गायीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटनेची माहिती दुसऱ्या दिवशी दुपारी संपूर्ण गावात पसरली. यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी याविरोधात निषेध नोंदवत रास्तारोको केला. परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. हस्तक्षेप करत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. शिवाय, आरोपीविरोधात कारवाई करण्याचं आश्वासनही ग्रामस्थांना दिलं. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी छोटे खानला अटक केली आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
#MadhyaPradesh: Relatives of a man, who was arrested last week for allegedly raping a cow in Rajgarh's Suthaliya met SP say he has been wrongly accused after getting into property dispute with another man. Police official says 'they've complained to us, we will investigate this' pic.twitter.com/Ck6qMmn1Yw
— ANI (@ANI) August 6, 2018