कुष्ठरोग्यांना प्रमाणपत्र देण्यास स्वतंत्र नियम बनवा; केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 02:02 AM2018-09-15T02:02:13+5:302018-09-15T02:02:33+5:30

कुष्ठरोगाचे निर्मूलन व कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन याबाबत खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारांना विविध आदेश दिले.

Make separate rules for giving certificates to lepers; Supreme Court Order to the Central Government | कुष्ठरोग्यांना प्रमाणपत्र देण्यास स्वतंत्र नियम बनवा; केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

कुष्ठरोग्यांना प्रमाणपत्र देण्यास स्वतंत्र नियम बनवा; केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

googlenewsNext

नवी दिल्ली : कुष्ठरोग्यांना आरक्षण व विविध समाजकल्याणकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी त्यांना अपंग असल्यासंदर्भातले प्रमाणपत्र देण्याकरिता स्वतंत्र नियम बनवावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शुक्रवारी दिला आहे.
कुष्ठरोगाचे निर्मूलन व कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन याबाबत खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारांना विविध आदेश दिले. न्यायालयाने म्हटले आहे की, कुष्ठरोग्यांना भेदभावाची वागणूक देऊ नये याबाबत खासगी व सरकारी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जाव्यात.
कुष्ठरोगाविषयी सरकारने जनजागृती मोहीम हाती घेतली पाहिजे. त्यांच्या मुलांना शाळांमध्ये सापत्नभावाची वागणूक मिळू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी नियम बनविले पाहिजेत.

Web Title: Make separate rules for giving certificates to lepers; Supreme Court Order to the Central Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.