CBSE टॉपर बलात्कार प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 09:01 AM2018-09-17T09:01:10+5:302018-09-17T10:33:40+5:30

हरियाणातील रेवाडीमध्ये 19 वर्षीय तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

main accused nishu arrested in rewari gangrape | CBSE टॉपर बलात्कार प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक

CBSE टॉपर बलात्कार प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक

Next

रेवाडी : हरियाणातील रेवाडीमध्ये 19 वर्षीय तरुणीचे अपहरण करुन सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. 

पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील मुख्य आरोपी नीशूला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने 30 तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक केली. दीनदयाल आणि डॉ. संजीव यांचा यामध्ये समावेश आहे. तर मुख्य आरोपी नीशूलाही पकडण्यात आता यश आले आहे.


पोलिसांनी दीनदयाल हा ट्यूबवेलचा मालक आहे. तिथेच ही घटना घडली. तर संजीव डॉक्टर आहे. त्याने आरोपींना मदत केली. तसेच या घटनेत सहभागी असल्याचे पुरावे मिळाल्याचे सांगितले. मुख्य आरोपी नीशूने हा संपूर्ण कट रचला होता. त्यानंतर घटनास्थळी डॉक्टरला बोलावण्यात आले होते. या कटात लष्कराचा एक जवान ही सहभागी आहे. मात्र तो सध्या फरार आहे. लवकरच त्याला पकडण्यात येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक नाजनीन भसीन यांनी व्यक्त केला आहे. 
 

Web Title: main accused nishu arrested in rewari gangrape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.