हनुमान दलित नाही आदिवासी होते - नंदकुमार साय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 12:29 PM2018-11-30T12:29:49+5:302018-11-30T12:41:28+5:30

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचं विधान केल्यानंतर नवा सुरू झाला आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आता अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय हनुमान यांनी एक विधान केलं आहे.

Lord Hanuman was a tribal, says NCST chairman | हनुमान दलित नाही आदिवासी होते - नंदकुमार साय

हनुमान दलित नाही आदिवासी होते - नंदकुमार साय

Next
ठळक मुद्देअनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय हनुमान यांनी एक विधान केलं आहे. 'हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते' असं साय यांनी म्हटलं आहे. अनुसूचित जातींमध्ये हनुमान हे एक गोत्र असतं.


लखनौ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचं विधान केल्यानंतर नवा सुरू झाला आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच आता अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय हनुमान यांनी एक विधान केलं आहे. 'हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते' असं साय यांनी म्हटलं आहे. 

अनुसूचित जातींमध्ये हनुमान हे एक गोत्र असतं. कुडूक या अनुसूचित जातीमध्ये तिग्गा नावाचे गोत्र आहे ज्याचा अर्थ वानर असा होतो. तसेच अनुसूचित जातींमध्ये हनुमान आणि गिधाड अशी देखील गोत्रं आहेत असं साय यांनी म्हटलं आहे. प्रभू श्रीरामाने ज्या दंडकारण्यात सैन्य गोळा केलं. त्यामध्ये अनुसूचित जातींचे लोक होते. त्यामुळे हनुमान हे दलित नव्हे तर अनुसूचित जातीचे होते असं नंदकुमार साय यांनी म्हटलं आहे. राजस्थानमध्ये एका प्रचार सभेत याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी  भगवान हनुमान हे दलित असल्याचं म्हटलं होतं. 

Web Title: Lord Hanuman was a tribal, says NCST chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.