लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयं

By Admin | Updated: August 2, 2015 22:55 IST2015-08-02T22:55:05+5:302015-08-02T22:55:05+5:30

तीनिमित्त पदयात्रा

Lokshahir Annabhau Sathe Jain | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयं

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयं

निमित्त पदयात्रा
इंदापूर । दि. २ (वार्ताहर)
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त संपूर्ण शहरातून पदयात्रा काढण्यात आली. सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.
श्री रामवेस नाक्याजवळच्या लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष अशोक इजगुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या वेळी उपनगराध्यक्ष भरत शहा, मुख्याधिकारी नानासाहेब कामठे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माया विंचू, वर्षा मखरे, सायरा पठाण, गजानन गवळी, अनिता ढावरे, माऊली वाघमोडे, राजेंद्र चौगुले आदी उपस्थित होते.
आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटोळे,ललेंद्र शिंदे,अरुण ढावरे, सतीश सागर, अजय शिंदे, रुपेश कांबळे, नितीन पाटोळे, दादा ढावरे, दादा सोनवणे आदींसह तीनशे युवकांनी आण्णाभाऊंचा जयघोष करत पदयात्रेद्वारे आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासह सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांस पुष्पहार अर्पण केले. तोफांची सलामी दिली. ठिकठिकाणी पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.
—————————————————

Web Title: Lokshahir Annabhau Sathe Jain