सरकारी नोकरीसाठीचे परीक्षा शु्ल्क रद्द करणार : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2019 02:31 PM2019-04-09T14:31:53+5:302019-04-09T14:37:10+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारी पद भरण्यासंदर्भात आणखी एक घोषणा केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास सरकारी नोकरीसाठी भरण्यात येणारे परीक्षा शुल्क रद्द करणार असल्याचे म्हटले. याचा लाभ स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या युवकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

Lok Sabha Election 2019 Rahul Gandhi promises removal of fees on application for government exams, jobs | सरकारी नोकरीसाठीचे परीक्षा शु्ल्क रद्द करणार : राहुल गांधी

सरकारी नोकरीसाठीचे परीक्षा शु्ल्क रद्द करणार : राहुल गांधी

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी आपापला जाहिरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने आपल्या जाहिरनाम्यात गरिब आणि तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले. तर भाजपने मध्यमवर्गीयांना केंद्रबिंदू ठेवले असून राष्ट्रवादावर अधिक भर दिला आहे. काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर आता आणखी एक घोषणा केली आहे. ही घोषणा स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे आणि सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या तरुणांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

देशातील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचा दावा काँग्रेससह विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने रोजगार उपलब्ध करून देणे आणि देशभरात रिक्त असलेले लाखो सरकारी पदे भरण्याचे आश्वासन दिले आहे. तर भाजपने रिक्त असलेले सरकारी पदे भरण्यासंदर्भात काहीही म्हटले नाही.

दरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारी पद भरण्यासंदर्भात आणखी एक घोषणा केली आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास सरकारी नोकरीसाठी भरण्यात येणारे परीक्षा शुल्क रद्द करणार असल्याचे म्हटले आहे. याचा लाभ स्पर्धा परिक्षेची तयारी करत असलेल्या युवकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

देशात आणि राज्यात अनेक तरुण स्पर्धा परिक्षांची तयारी करतात. अनेकदा जागा कमी निघतात, त्यामुळे अनेकांना नोकरीपासून वंचित राहावे लागते. परंतु, नोकरीसाठी आधीच मोठ्या प्रमाणात शुल्क भरावे लागते. नोकरी मिळाली नाही, की भरलेली रक्कम देखील तशीच जाते. काँग्रेस अध्यक्षांनी ही गोष्ट लक्षात घेत पदभरतीसोबतच तरुणांना अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या शुल्काची देखील काळजी घेतली आहे.

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Rahul Gandhi promises removal of fees on application for government exams, jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.