लोकसभा निवडणुकीत 255 महिला उमेदवार कोट्यधीश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 02:00 PM2019-05-20T14:00:50+5:302019-05-20T14:13:23+5:30

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाने महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली असल्याचे समोर आले आहे. 724 महिलांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढवली.

 lok sabha election 2019 255 women candidates millionaires in Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकीत 255 महिला उमेदवार कोट्यधीश

लोकसभा निवडणुकीत 255 महिला उमेदवार कोट्यधीश

googlenewsNext

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. या निवडणुकीत महिला उमेदवार मोठ्या प्रमाणात होत्या. देशातील 542 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत 724 महिलांनी निवडणूक लढवली. यातील 43 महिला उमेदवारांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवली आहे. लोकसभा निवडणुकीत 255 महिला उमेदवार कोट्यधीश असल्याच्या समोर आले आहे.  तर, गुन्हे दाखल असलेल्या महिला उमेदवारांचा टक्का 2014 पेक्षा यावेळी वाढलेला पहायला मिळाले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्षाने महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली असल्याचे समोर आले आहे. 724 महिलांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढवली. यात एकट्या महाराष्ट्रात 79 महिलांनी आपले नशीब अजमावत आहे . 724 महिला उमेदवारांपैकी 255 महिला उमेदवार ह्या कोट्यधीश होत्या. यात भाजप आणि कॉंग्रेसच्या प्रत्येकी 44 महिला उमेदवार ह्या कोट्यधीश असल्याचे आकडेवारीतून समोर आली आहे. देशातील एकूण महिला उमेदवारांपैकी 8 महिलांकडे कोणतेही संपती नसल्याचा त्यांच्या घोषणापत्रात सांगण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावत असलेल्या एकूण महिला उमेदवारांपैकी 110 (15%) उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहेत. भाजपच्या 53 महिला उमेदवारांपैकी 18 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. तर, कॉंग्रेसचा 54 महिला उमेदवारांपैकी 14 उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्याची माहिती घोषणापत्रात देण्यात आली आहे. आकडेवारीनुसार 222 अपक्ष महिला उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेल्या सरिता नायर यांच्याविरोधात सर्वाधिक 34 गुन्हे दाखल झाले आहेत.

यूपीच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असलेल्या हेमा मालिनी सर्वात जास्त श्रीमंत महिला उमेदवार ठरल्या आहेत. त्यांची मालमत्ता 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तमिळनाडूच्या दक्षिण चेन्नई लोकसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार असलेल्या सी. रोसा ह्या देशातील सर्वात गरीब महिला उमेदवार आहेत. त्यांची संपत्ती फक्त 2023 असल्याची नोंद त्यांच्या घोषणापत्रात केली आहे.

 

 

Web Title:  lok sabha election 2019 255 women candidates millionaires in Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.