Bhaiyyuji Maharaj: ...म्हणून वर्षभरापूर्वीच भय्यू महाराजांनी केलं होतं दुसरं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2018 15:55 IST2018-06-12T15:55:07+5:302018-06-12T15:55:07+5:30
वर्षभरापूर्वीचं त्यांनी दुसरं लग्न केलं होतं.

Bhaiyyuji Maharaj: ...म्हणून वर्षभरापूर्वीच भय्यू महाराजांनी केलं होतं दुसरं लग्न
मुंबई- अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. इंदूरमधील सिल्वर स्प्रिंग या त्यांच्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. कौटुंबिक तणावाला कंटाळून भय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. तसंच आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नका, असंही त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.
माधुरी असं भय्यूजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं.त्या मूळ औरंगाबादच्या होत्या. भय्यू महाराज व माधुरी यांची एक मुलगी असून कुहू असं तिचं नाव आहे. ती सध्या पुण्यात शिक्षण घेते आहे. पुण्यात वानवडी येथे 21 नोव्हेंबर 2015 रोची माधुरी यांचं निधन झालं होतं.
माधुरी यांच्या निधनानंतर वर्षभरापूर्वीच भय्यू महाराज यांनी दुसरं लग्न केलं. डॉ.आयुषी यांच्याबरोबर त्यांनी लग्नगाठ बांधली. 85 वर्षीय आई कुमुदिनी देशमुख व 15 वर्षीय मुलगी कुहू हिची काळजी घेण्यासाठी त्यांनी दुसरा विवाह केला होता.