केरळमध्ये पावसाचा हाहाकार, 22 जणांचा मृत्यू, पाहा फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:58 PM2018-08-09T16:58:01+5:302018-08-09T17:19:23+5:30

केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

Kerala floods live updates: 20 dead in Kerala due to rain, landslides | केरळमध्ये पावसाचा हाहाकार, 22 जणांचा मृत्यू, पाहा फोटो...

केरळमध्ये पावसाचा हाहाकार, 22 जणांचा मृत्यू, पाहा फोटो...

Next

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
आपत्ती नियंत्रण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इडुक्कीमध्ये भूस्खलन होऊन 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, मलप्पुरममध्ये 5, कन्नूरमध्ये 2 आणि वायनाड जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच, वायनाड, पलक्कड आणि कोझिकोड याठिकाणी काही लोक बेपत्ता झाल्याचे समजते. तर, इडुक्कीमधील अडीमाली शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.




केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. आर्मी, नेव्ही, कोर्ट गार्ड आणि एनडीआरएफकडून मदत मागितली आहे. तीन एनडीआरएफच्या तीन पथके बचावासाठी दाखल झाली आहेत. दोन पथके पोहचणार आहेत. तसेच, आणखी सहा पथकांना बोलविण्यात आले आहे, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली आहे.




दरम्यान, या पावसामुळे केरळमधील विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. राज्यातील शाळा, कॉलेजला सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. याचबरोबर, मुसळधार पावसामुळे इडुक्की येथील धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे 26 वर्षांनंतर खुले करण्यात आले आहेत. गुरुवारी या धरणातून 600 क्यूसेक पाणी सोडण्यात आले. 



 



 



 

Web Title: Kerala floods live updates: 20 dead in Kerala due to rain, landslides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.