कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्यावर आज होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 08:33 AM2019-07-09T08:33:05+5:302019-07-09T08:36:33+5:30

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत.

karnataka political crisis still on today speaker will take call on resignations | कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्यावर आज होणार फैसला

कर्नाटकातील आमदारांच्या राजीनाम्यावर आज होणार फैसला

Next

बेंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे 13 महिन्यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेस-जनता दल (एस) यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस-जनता दल (एस)च्या आमदारांनी राजीनामे देऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सरकार पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

सरकार वाचवण्यासाठी बंडखोरांना मंत्री करता यावे आणि भाजपाचा सरकार पाडण्याचा डाव उलटून लावावा, यासाठी दोन्ही पक्षांच्या सर्व आमदारांनी सोमवारी पदाचे राजीनामे दिले. मात्र, दोन अपक्ष मंत्री एच. नागेश व आर. शंकर यांनी राजीनाम्याबरोबरच कुमारस्वामी सरकारला दिलेला पाठिंबाही काढून घेतला.

दरम्यान, आमदारांच्या राजीनामा नाट्यावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण, या आमदारांच्या राजीनाम्यावर विधानसभाध्यक्ष रमेश कुमार आज निर्णय घेणार आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांना आमदारांचे राजीनामे घेऊ नका, असे सांगितले आहे. तसेच, सरकार वाचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसने आपल्या आमदारांची आज सकाळी साडे नऊ वाजता विधानसौदामध्ये बैठक बोलविली आहे. 

आमदाराकीचा राजीनामा दिलेले सारे जण मुंबईच्या सोफीटेल हॉटेलात मुक्कामास होते. काँग्रेस व जनता दलाच्या सर्वच मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले आहेत. तेथून ते कर्नाटकात परतणार की, सरकार पडेपर्यंत तिथेच थांबणार, हे स्पष्ट झालेले नाही.

काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा द्यावा
कर्नाटक मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, असा निर्णय उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सिद्धरामय्या, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर काही वेळातच सरकारमधील जनता दलाच्या सर्व मंत्र्यांनीही आपल्या पदांचे राजीनामे दिले. काँग्रेसच्या मंत्र्यांनी स्वत:हून राजीनामे दिले, असे वेणुगोपाल यांनी सांगितले.
 

Web Title: karnataka political crisis still on today speaker will take call on resignations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.