Karnataka Election 2018:भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी येडियुरप्पा, म्हणाले उद्या घेणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 11:12 AM2018-05-16T11:12:41+5:302018-05-16T12:14:16+5:30

कर्नाटक विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

Karnataka Election 2018: who will form government in karnataka | Karnataka Election 2018:भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी येडियुरप्पा, म्हणाले उद्या घेणार शपथ

Karnataka Election 2018:भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी येडियुरप्पा, म्हणाले उद्या घेणार शपथ

बेंगळुरू -  कर्नाटक विधानसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या, तरी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र भाजपा सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. बी.एस.येडियुरप्पा यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवडदेखील करण्यात आली आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. 

दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी भाजपा, काँग्रेस आणि जेडीएसकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. जेडीएस-काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे बेंगळुरूमध्ये काँग्रेस-जेडीएस-भाजपा आपल्या आमदारांसोबत बैठकांवर बैठका घेण्यात व्यस्त झाले आहेत.  

LIVE UPDATES :

- पक्षाने माझी विधिमंडळ नेतेपदी निवड केली. त्याबाबतचं पत्र राज्यपालांना दिलं. मला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल आमंत्रित करतील अशी आशा आहे - येडियुरप्पा
- एचडी कुमारस्वामीच कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील आणि हे आघाडीचं सरकार असेल. हेच सत्य आहे. आम्ही कोणाच्या प्रभावाखाली येणार नाही - जेडीएस
- बी. एस. येडियुरप्पा आणि प्रकाश जावडेकर राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल.
- उद्या शपथ घेणार - येडियुरप्पा 
- येडियुरप्पा यांची भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड 
- आमच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत विधिमंडळाचा नेता निवडला जाईल. यानंतर आम्ही थेट राज्यपालांकडे जाणार आणि सत्ता स्थापनेचा दावा करणार. -येडियुरप्पा
-  मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, भाजपाला धमकावण्याशिवाय दुसरे काहीही येत नाही
-  कर्नाटकात काँग्रेसची बैठक सुरू
- जेडीएसच्या बैठकीत पक्षाचे दोन आमदार अनुपस्थित, तर काँग्रेसचे चार आमदारही बैठकीला गैरहजर, काँग्रेसचे 78 पैकी 60 आमदार सध्या उपस्थित
-  जेडीएसचे आमदार श्रवण यांनी सांगितले की, आमच्या जवळपास 4-5 आमदारांना संपर्क करण्यात आला होता. मात्र आमच्यात फूट पडणार नाही, आमचे 80 टक्के आमदार बैठकीसाठी हजर आहेत. 
- कांग्रेसनं इग्लटन रिसॉर्टमध्ये आपल्या आमदारांसाठी रुम बुक केल्याची माहिती समोर आली आहे. 120 रुम बुक करण्यात आल्याचे बोलले जात आहे. 
- भाजपच्या घोडेबाजाराची धास्ती, काँग्रेस आपल्या आमदारांना विशेष विमानाने बेंगळुरुला घेऊन जाणार, सर्व आमदारांना एकत्र ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

भाजपाचे नेते येडियुरप्पा, तसेच जनता दलाचे नेते कुमारस्वामी यांनी मंगळवारीदेखील (15 मे) राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊ न सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपाचे १0४ जण निवडून आले आहेत. काँग्रेसचे ७८ व जनता दलाचे ३७ व बसपाचा एक निवडून आले असून, त्यांची बेरीज ११६ होते. सत्तेसाठी सध्या ११२ आमदारांची गरज आहे. भाजपाकडे ७ आमदार कमी असून, ते मिळविण्यासाठी जनता दल व काँग्रेस यांचे आमदार फोडण्याचे प्रयत्न होऊ शकतील. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.




राज्यपालांपुढे ४ पर्याय
कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाले नाही, तर राज्यघटनेनुसार सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी कोणते पर्याय तपासावेत, याची शिफारस सरकारी आयोगाने केली होती. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्यापुढे हे चार पर्याय, त्याच क्रमाने, उपलब्ध आहेत:

१. सर्वाधिक जागा मिळविणारा वा निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या पक्षांना पाचारण करणे.
- येथे काँग्रेस आणि जेडीएसने निवडणूकपूर्व आघाडी न केल्याने हा पर्याय कामी नाही. भाजपाला प्रथम बोलविले जाईल.

२. अपक्षांसह इतरांच्या पाठिंब्याने सरकार स्थापनेचा दावा सर्वाधिकजागा जिकणाऱ्या पक्षाने केल्यास त्यांना निमंत्रण देणे.
- यानुसारही भाजपाला फायदा होईल.

३. निवडणुकीनंतर आघाडी केलेले सर्व पक्ष सरकारमध्ये सहभागी होणार असतील, तर त्यांना संधी देणे.
- भाजपा बहुमतासाठीच्या फोडाफोडीत अपयशी ठरल्यास काँग्रेस-जेडीएसला पाचारण केले जाईल.

४. निवडणुकीनंतर आघाडी केलेल्या पक्षांपैकी काही सरकारमध्ये राहून व काही बाहेरून पाठिंबा देणार असतील, तर त्यांना बोलावणे.
- येथेही काँग्रेस-जीडीएसला संधी मिळेल.

 



 

Web Title: Karnataka Election 2018: who will form government in karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.