कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम, जेव्हा १८ हजार फूटावर भारतीय सेनेने अशी चारली पाकला धूळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:31 AM2018-07-26T11:31:12+5:302018-07-26T11:34:19+5:30

१९ वर्षांआधी आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस दरवर्षी विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

Kargil Vijay Diwas : everything you want to know about Kargil war | कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम, जेव्हा १८ हजार फूटावर भारतीय सेनेने अशी चारली पाकला धूळ!

कारगिल युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम, जेव्हा १८ हजार फूटावर भारतीय सेनेने अशी चारली पाकला धूळ!

googlenewsNext

मुंबई : १९ वर्षांआधी आजच्याच दिवशी म्हणजेच २६ जुलै १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस दरवर्षी विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. साधारण दोन महिने चाललेलं कारगिल युद्ध हे साहस आणि शौर्याचं असं उदाहरण आहे ज्यावर प्रत्येक भारतीयाला अभिमान असायला हवा. जवळपास १८ हजार फूट उंचीवर कारगिलमध्ये झालेल्या या युद्धात देशाने ५२७ वीर गमावले होते तर १३०० पेक्षा जास्त जखमी झाले होते. 

तशी तर या युध्दाची सुरूवात पाकिस्तानने ३ मे १९९९ मध्येच केली होती. त्यावेळीच त्यांनी कारगिलच्या उंच डोंगरांवर ५ हजार सैनिकांच्या मदतीने ताबा मिळवला होता. या घटनेची माहिती जेव्हा भारत सरकारला मिळाली तेव्हा भारतीय सेनेने पाकिस्तानच्या सैनिकांना हाकलून लावण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केलं. यात भारतीय सेनेने पाकिस्तान विरोधात मिग-२७ आणि मिग-२९ यांचाही वापर केला. त्यासोबतच जिथेही पाकिस्तानने घुसखोरी करून ताबा मिळवला होता तिथे बॉम्ब हल्ले करण्यात आले.  

या युद्धात मोठ्या संख्येने रॉकेट आणि बॉम्बचा वापर करण्यात आला. यादरम्यान साधारण २ लाख ५० हजार बॉम्ब गोळे टाकण्यात आले होते. तेच ५ हजार बॉम्ब फायर करण्यासाठी ३०० पेक्षा जास्त मोर्टार, तोपों आणि रॉकेटचा वापर करण्यात आला होता. युद्धाच्या १७ दिवसात दररोज प्रति मिनिटे एक राऊंड फायर केला गेला. असे म्हटले जाते की, दुसऱ्या महायुध्दानंतर हेच एक दोन देशांमधील युद्ध होतं ज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब हल्ले करण्यात आले. चला जाणून घेऊ या युद्धाचा संपूर्ण घटनाक्रम.

कारगिल युद्धाचा घटनाक्रम

३ मे १९९९ - एका व्यक्तीने भारतीय सेनेला कारगिलमध्ये पाकिस्तान सेनेने घुसखोरी करून ताबा मिळवल्याची माहिती दिली होती. 

५ मे १९९९ - भारतीय सेनेची पेट्रोलिंग टीम याची माहिती घेण्यासाठी कारगिल पोहोचली. त्यावेळी पाकिस्तानी सेनेने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यातील ५ जणांची निर्घुण हत्या केली. 

९ मे १९९९ - पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय सेनेचं कारगिलमधील गोळाबारूद केंद्र नष्ट झालं. 

१० मे १९९९ - पहिल्यांदा पाकिस्तानी घुसखोरांना लदाखचं प्रवेश व्दार म्हणजेच दास, काकसार आणि मुश्कोह सेक्टरमध्ये पाहिलं गेलं.  

२६ मे - भारतीय सेनेने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

२७ मे - कार्यवाहीमध्ये भारतीय वायुसेनेने पाकिस्तान विरूद्ध मिग-२७ आणि मिग-२९ चा वापर केला. आणि फ्लाईट लेफ्टनंट नचिकेताला बंदी बनवलं.

२८ मे - एक मिग-२७ हेलिकॉप्टर पाकिस्तानकडून पाडण्यात आलं आणि यात चार भारतीय सैनिक शहीद झाले.

कारगिलचा घटनाक्रम

१ जून - एनएच-१ए वर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला.

५ जून - पाकिस्तानी रेंजर्सकडून मिळालेल्या कागदपत्र भारतीय सेनेने मीडियासाठी जारी केले. ज्यात पाकिस्तामी रेंजर्सच्या असण्याचा उल्लेख आहे. 

६ जून - भारतीय सेनेने पूर्ण ताकदीनिशी पाकिस्तानला उत्तर देण्यास सुरुवात केली. 

९ जून - बाल्टिक क्षेत्राच्या २ मुख्य चौक्यांवरील पाकिस्तानी सैनिकांना ठार करत भारतीय सेनेने पुन्हा त्या चौकीवर ताबा मिळवला.

११ जून - भारताने जनरल परवेझ मुशर्रफ आणि आर्मी चीफ लेफ्टनंट जनरल अजीज खान यांच्यातील झालेल्या संवादाचं रेकॉर्डींग जारी केलं. यात उल्लेख आहे की, या घुसखोरीमध्ये पाक आर्मीचा हात आहे. 

१३ जून - भारतीय सेनेने द्रास सेक्टरमधील चौकीवर ताबा मिळवला.

१५ जून - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी परवेझ मुशर्रफ यांना फोन करून सांगितले की, आपलं सैन्य कारगिल सेक्टरमधून मागे बोलवा.

२९ जून - भारतीय सेनेने टायगर हिलजवळील दोन महत्वपूर्ण चौक्यांवर ५०६० आणि ५१०० वर ताबा मिळवला.

कारगिल युद्धाचा घटनाक्रम

२ जुलै - भारतीय सेनेने कारगिलवर तीन बाजूंनी हल्ला चढवला.

४ जुलै - भारतीय सेनेने टायगर हिलवर पुन्हा ताबा मिळवला.

५ जुलै - भारतीय सेनेने द्रास सेक्टरवर पुन्हा ताबा मिळवला. त्यानंतर लगेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी बिल क्लिंटन यांना सांगितले की, ते पाकिस्तानमधून त्यांची सेना माघारी बोलवत आहे. 

७ जुलै - भारतीये सेनेने बटालिकमध्ये असलेल्या जुबर हिलवर ताबा मिळवला.

११ जुलै - पाकिस्तानी रेंजर्सनी बटालिकमधून पळण्यास सुरुवात केली. 

१४ जुलै - पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केली. 

२६ जुलै - पंतप्रधानांनी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा आदेश दिला.
 

Web Title: Kargil Vijay Diwas : everything you want to know about Kargil war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.