2019 पासून विद्यार्थ्यांना मिळणार JEE आणि NEET चे मोफत क्लास 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 03:11 PM2018-08-30T15:11:41+5:302018-08-30T15:12:14+5:30

उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे.

JEE and NEET's free classes will be available from 2019 | 2019 पासून विद्यार्थ्यांना मिळणार JEE आणि NEET चे मोफत क्लास 

2019 पासून विद्यार्थ्यांना मिळणार JEE आणि NEET चे मोफत क्लास 

Next

 नवी दिल्ली - उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने खूशखबर दिली आहे. उच्च शिक्षणासाठी पात्रता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षी म्हणजे 2019 पासून सरकारकडून मोफत क्लासची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे JEE आणि NEET सारख्या परीक्षांच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी घेणे शक्य होणार आहे. 

सरकारने उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी गठीत केलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीमुळे हे शक्य होणार आहे. JEE आणि NEET च्या अभ्यासक्रमांच्या मोफत क्लास साठी एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) आपल्या 2 हजार 697 सराव केंद्रांना दोन वर्षांत शिक्षण केंद्रांमध्ये परिवर्तीत करणार आहे.  मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही  शिक्षण केंद्रे 8 सप्टेंबरपासून सुरू होतील.   

या केंद्रामधून मे 2019 पासून शिकवण्या सुरू होतील. पहिल्या फेरीत एनटीए जेईई-मेन या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेईल. जे विद्यार्थी मोबाइल अॅप आणि संकेतस्थळांवरून एनटीएसाठी नोंदणी करतील त्यांना NEETUG आणि JEE द्वारे आयोजित होणाऱ्या सराव परीक्षेत सहभागी होता येईल. त्याबरोबरच या विद्यार्थ्यांना एनटीएच्या शिक्षकांबरोबर चर्चाही करता येईल. त्यामुळे अभ्यासात झालेल्या चुका समजण्यास त्यांवा मदत होईल.

 मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सराव केंद्रांमध्ये सर्वप्रथम जेईई मेनच्या विद्यार्थ्यांना मॉक परीक्षा देण्याची संधी देण्यात येईल. नीट-यूजीची सध्यातरी संगणकावर आधारीत परीक्षा घेण्यात येत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी कुठलीही मॉक परीक्षा आयोजित केली जाणार नाही. 

 यासाठी एनटीए 1 सप्टेंबर रोजी मोबाइल अॅप आणि वेबसाइट लॉन्च करणार आहे. त्याच दिवशी यूजीसी-एनईटी-2018 आणि जेईई मेन साठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. ही नोंदणी 30 सप्टेंबरपर्यंत चालेल.  

Web Title: JEE and NEET's free classes will be available from 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.