जम्मू काश्मीरमधील उधमपूरला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 09:56 AM2019-05-09T09:56:51+5:302019-05-09T09:57:50+5:30

पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून रस्ता 'मार्गी'

jammu kashmir Udhampur village gets its first road since Independence | जम्मू काश्मीरमधील उधमपूरला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला रस्ता

जम्मू काश्मीरमधील उधमपूरला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मिळाला रस्ता

Next

श्रीनगर: जम्मू-काश्मीरधल्या उधमपूरला स्वातंत्र्यानंतर पहिला रस्ता मिळाला आहे. उधमपूरमधल्या मर्ता पंचायतीचे ग्रामस्थ स्वातंत्र्यापासून रस्त्याची वाट पाहत होते. अखेर स्वातंत्र्यानंतर 71 वर्षांनी त्यांचं स्वप्न साकार झालं. रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अखेर रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं स्थानिकांनी आनंद व्यक्त केला.

रस्ता नसल्यानं मर्ताच्या ग्रामस्थांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. विद्यार्थ्यांना शेतांमधून सहा ते सात किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. अखेर स्वातंत्र्यानंतरच्या तब्बल सात दशकांनंतर उधमपूरला रस्ता मिळाला आहे. पंतप्रधान मंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याचं काम पूर्ण झालं. याबद्दल एका 73 वर्षीय ग्रामस्थानं आनंद व्यक्त केला. 'मी लहान असताना अनेकांनी आपल्या गावात रस्ता येणार असल्याचं मला सांगितलं होतं. मात्र त्यासाठी कित्येक वर्ष लागली. आता मला निवृत्ती वेतन येतं आणि गावात रस्ताही आला आहे,' असं ते म्हणाले.

Web Title: jammu kashmir Udhampur village gets its first road since Independence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.