जम्मू-काश्मीरः भारतीय जवानांचा हिसका; सीमेवर पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 09:03 AM2018-05-26T09:03:28+5:302018-05-26T09:03:28+5:30

जम्मू-काश्मीरच्या तंगधर सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी धडक कारवाई करत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे.

Infiltration bid foiled by security forces in Tangdhar sector of Jammu And Kashmir | जम्मू-काश्मीरः भारतीय जवानांचा हिसका; सीमेवर पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरः भारतीय जवानांचा हिसका; सीमेवर पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

Next

श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या तंगधर सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी धडक कारवाई करत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी पाच अतिरेक्यांना कंठस्नान घातलं असून अजूनही चकमक सुरू आहे. 

रमझानच्या काळात केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील सुरक्षारक्षकांना सशर्त शस्त्रसंधीचे आदेश दिले होते. दहशतवाद्यांकडून हल्ला झाला, तर त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल, पण भारत स्वतःहून असं ऑपरेशन करणार नाही, अशी भूमिका केंद्राने घेतली होती. त्याचा गैरफायदा घेत दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवरील कुरापती वाढल्या होत्या. परंतु, आज लष्कराने त्यांना आपला हिसका दाखवला. 

पहाटेच्या अंधाराचा फायदा घेऊन पाच दहशतवादी तंगधर सेक्टरमधून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याची कुणकुण लागताच जवानांनी त्यांना घेरलं आणि चकमक उडाली. त्यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारताचे वीर यशस्वी झाले. आता या संपूर्ण भागात 'सर्च ऑपरेशन' सुरू आहे.    



Web Title: Infiltration bid foiled by security forces in Tangdhar sector of Jammu And Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.