देशातले 50 टक्के श्रीमंत आहेत 'या' 5 राशींचे; बघा तुम्हाला धनलाभाचा योग आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 02:09 PM2018-09-29T14:09:02+5:302018-09-29T14:09:21+5:30

जगभरात अनेक कोट्यधीश आहेत. त्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. बार्कलेज हुरुन इंडियानंही अशा श्रीमंतांची एक यादी प्रसिद्ध केली होती.

indias maximum richest people belong to special zodiac sign | देशातले 50 टक्के श्रीमंत आहेत 'या' 5 राशींचे; बघा तुम्हाला धनलाभाचा योग आहे का?

देशातले 50 टक्के श्रीमंत आहेत 'या' 5 राशींचे; बघा तुम्हाला धनलाभाचा योग आहे का?

Next

नवी दिल्ली- जगभरात अनेक कोट्यधीश आहेत. त्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. बार्कलेज हुरुन इंडियानंही अशा श्रीमंतांची एक यादी प्रसिद्ध केली होती. परंतु तुम्हाला माहीत आहे का, बार्कलेज हुरुन इंडियानं प्रसिद्ध केलेल्या यादीतील श्रीमंत व्यक्तींपैकी जवळपास 50 टक्के लोक विशेष पाच राशींमधून येतात.

बार्कलेज हुरून इंडियानं जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीतील 50 टक्के श्रीमंत माणसे ही कर्क, कन्या, मेष, वृश्चिक आणि मकर राशीतून येतात. यातील 10.50 टक्के संपत्तीसह कर्क राशीतील लोक सर्वात वरच्या स्थानी आहेत. कर्क राशीच्या श्रीमंतांमध्ये 71,200 कोटींच्या संपत्तीसह गौतम अडानी सर्वात श्रीमंत आहेत. देशात श्रीमंतांच्या यादीत दुस-या स्थानी कन्या राशीचे लोक आहेत. कन्या राशीच्या लोकांकडे 9.70 टक्के संपत्ती आहे. त्यानंतर तिस-या स्थानी मेष राशीच्या व्यक्तींचा समावेश आहे.  त्यांच्याजवळ 9.3 टक्के संपत्ती आहे. चौथ्या क्रमांकावर वृश्चिक राशीचे लोक असून, ते 9.2 टक्के संपत्तीचे मालक आहेत.

तर मकर राशीतले व्यक्ती 9 टक्क्यांच्या संपत्तीसह 5 स्थानी आहेत. शापूरजी पालोनजी मिस्त्री कन्या राशीतील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. तर रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी, लुलू ग्रुपचे युसुफ अली आणि गोदरेजची स्मिता वी. कृष्णा या श्रीमंत व्यक्ती मेष राशीतील आहेत. मेषनंतर वृश्चिक आणि मकर राशींचा नंबर लागतो. कर्क, कन्या, मेष, वृश्चिक आणि मकरनंतर इतर राशींना या यादीत स्थान देण्यात आलं आहे. यात अनुक्रमे सिंह, मीन, मिथुन, वृषभ, कुंभ आणि धनू या राशींचा नंबर लागतो. या राशीच्या लोकांकडे क्रमशः 8.5 टक्के, 8.4 टक्के, 8.1 टक्के, 7.3 टक्के, 6.9 टक्के, 6.6 टक्के आणि 6.4 टक्के संपत्ती आहे.

बार्कलेज हुरुन इंडियाच्या यादीनुसार सिंह राशीचे असलेले विप्रोचे अजिम प्रेमजी हे श्रीमंत आहेत. तर सिंहनंतर तूळ राशीच्या सन फार्माच्या दिलीप सांघवी, कोटक बँकेचे उदय कोटक आणि मित्तल ग्रुपचे सीईओ एल. एन. मित्तल यांचा नंबर लागतो. तूळनंतर मीन आणि मिथुन राशींच्या लोकांना या यादीत स्थान देण्यात आलं आहे. सायरस पुनावाला, ब्रिटानियाचे नस्ली वाडिया आणि हिंदुजा ग्रुपचे एसपी हिंदुजा वृषभ, कुंभ आणि धनू राशीतून येतात. परंतु देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती हे मुकेश अंबानीच आहेत. 
 

Web Title: indias maximum richest people belong to special zodiac sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.