पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षेत केली वाढ; मोठा फौजफाटा तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:42 AM2024-02-14T10:42:54+5:302024-02-14T10:44:11+5:30

दिल्लीचे गृहमंत्री कैलाश गहलोत यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र लिहून परवानगी नाकारली आणि शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Increased security at Prime Minister's residence; A large army was deployed | पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षेत केली वाढ; मोठा फौजफाटा तैनात

पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुरक्षेत केली वाढ; मोठा फौजफाटा तैनात

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीला अक्षरश: किल्ल्याचे स्वरूप आले आहे. सर्व बाजूंनी सीमा सील केल्यामुळे दिल्ली-राष्ट्रीय राजधानी प्रदेशात मंगळवारी अनेक ठिकाणी वाहतूक गोगलगायीच्या गतीने सुरू होती. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या अडचणीत अडथळा आणण्यासाठी सिंघू आणि टिकरी सीमेवर अनेक स्तरांवर बॅरिकेड्स लावले आणि वाहतूक रोखल्याने वाहतूक कोंडी झाली. 

शेतकरी चार कोटींच्या मर्सिडिझने आले का?

गरीब शेतकरी चार कोटी रुपयांच्या मर्सिडिझने रस्ता अडविण्यासाठी आले आहेत, असे कॅप्शन देत मर्सिडिझ कारवर पेपर वाचत बसलेल्या एका शेतकऱ्याचा फोटो व्हायरल करण्यात येत आहे. मात्र हा फोटो दिशाभूल करणारा आहे. ही मर्सिडिझ ४ कोटी नव्हे तर दीड कोटी रुपयांची आहे. हा फोटो २०२० मध्येही शेतकरी आंदोलनादरम्यान व्हायरल करण्यात आला होता. फोटोतील दैनिक वाचत असलेली व्यक्ती एक उद्योजक आहे.

स्टेडियमचा तुरुंगात रूपांतराचा प्रस्ताव फेटाळला
मंगळवारी राष्ट्रीय राजधानीकडे शेतकऱ्यांचा मोर्चा पाहता बवाना स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रूपांतर करण्याचा केंद्राचा प्रस्ताव दिल्ली सरकारने फेटाळला. दिल्लीचे गृहमंत्री कैलाश गहलोत यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र लिहून परवानगी नाकारली आणि शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

६ महिन्यांचे रेशन, डिझेल सोबत
दिल्लीच्या दिशेने कूच करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की ते दीर्घ आंदोलनासाठी सज्ज आहेत. ६ महिने पुरेल इतके रेशन आणि डिझेल घेऊन त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. सुईपासून हातोड्यापर्यंत, आमच्याकडे ट्रॉलीमध्ये दगड फोडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहेत. सहा महिन्यांचे रेशन घेऊन आम्ही आमचे गाव सोडले आहे. 

Web Title: Increased security at Prime Minister's residence; A large army was deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.