शेतातील रस्त्यावरून दाम्पत्यास मारहाण

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:36+5:302016-04-26T00:16:36+5:30

नाशिक : दुचाकीवरून शेतात जाणार्‍या दाम्पत्यास नऊ संशयितांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़२३) सायंकाळच्या सुमारास संसरी गावात घडली़

Hit the dump by the road in the farm | शेतातील रस्त्यावरून दाम्पत्यास मारहाण

शेतातील रस्त्यावरून दाम्पत्यास मारहाण

शिक : दुचाकीवरून शेतात जाणार्‍या दाम्पत्यास नऊ संशयितांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि़२३) सायंकाळच्या सुमारास संसरी गावात घडली़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संसरी गावातील रहिवासी रामदास बाबूराव ठुबे व त्यांची पत्नी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दुचाकीने शेतात जात होते़ त्यावेळी संशयित भाऊसाहेब भैंद गोडसे याने या दोघांना थांबवून तुमच्या बापाचा रस्ता आहे का, असे विचारून हातातील लोखंडी रॉड ठुबे यांच्या पायावर मारला़ यावेळी त्यांची पत्नी सोडविण्यास गेली असता भंैद भीमा गोडसे, गोविंद भैंद गोडसे, सुका भैंद गोडसे, आनंदा भैंद गोडसे, कविता भाऊसाहेब गोडसे, अनिता सुका गोडसे, सुनीता गोडसे व सुशील गोडसे यांनी शिवीगाळ करून मारहाण केली़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नऊ संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Hit the dump by the road in the farm