गुरूग्राममध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 16 जणांना अटक, 12 मुलींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 10:08 AM2017-12-19T10:08:51+5:302017-12-19T10:12:28+5:30

हरियाणाच्या गुरूग्राममधील सेक्टर 39मधून पोलिसांनी एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

High-profile sex racket exposed in Gurgaam; 16 people arrested, 12 girls included | गुरूग्राममध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 16 जणांना अटक, 12 मुलींचा समावेश

गुरूग्राममध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 16 जणांना अटक, 12 मुलींचा समावेश

Next
ठळक मुद्देहरियाणाच्या गुरूग्राममधील सेक्टर 39मधून पोलिसांनी एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.पोलिसांनी एकुण 16 जणांना अटक केली आहे.

गुरूग्राम- हरियाणाच्या गुरूग्राममधील सेक्टर 39मधून पोलिसांनी एका हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून गेस्ट हाऊसवर छापा मारला. याप्रकरणी पोलिसांनी एकुण 16 जणांना अटक केली आहे. गुरूग्राममधील हे हायप्रोफाइल सेक्स रॅकेट गंगाव्हीला या गेस्टहाऊसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होतं. सेक्टर 39मधील गेस्टहाऊसमधून रविवारी रात्री पोलिसांनी 12 तरूणी व 4 तरूण अशा एकुण 16 जणांना अटक केली आहे. 



 

पोलिसांच्या माहितीनुसार, अटक केलेल्या तरूणी 20 ते 28 वयोगटातील आहे. यापैकी एक तरूणी जम्मू-काश्मीर, दोन जणी बिहार व तीन उत्तरखंडातील असून इतर दिल्लीच्या राहणाऱ्या आहेत. तसंच यामध्ये एका अफगाणिस्तानच्या मुलीचा सहभाग आहे. अटक केलेल्या लोकांमध्ये गंगाव्हिला गेस्ट हाऊसचा व्यवस्थापक कप्तान सिंहचाही समावेश आहे. तसंच व्हिलाच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे.  गुरूग्राम पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी रविंदर कुमार यांनी ही संपूर्ण माहिती दिली. 

गुरूग्राममधील या सेक्सरॅकेटमधील सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यातील तरूणींना जामिनावर सोडण्यात आलं. गंगाव्हिला गेस्टहाऊसमध्ये देहविक्रिता व्यवसाय बऱ्याच दिवसापासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी नुकतंच सेक्टर 51मध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. तेथून देहविक्रि करणाऱ्या 5 विदेशी मुली, 5 मुलं आणि 5 मुलींना अटक करण्यात आली होती. 
 

Web Title: High-profile sex racket exposed in Gurgaam; 16 people arrested, 12 girls included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.